ब्रह्मपुरी आरमोरी राज्य महामार्ग ठरतोय प्रवाशांना धोकादायक

    33

    ?नागपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामचुकारपणा

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    ब्रह्मपुरी(दि.17ऑगस्ट);-सरकारने नागपूर गडचिरोली मुख्य मार्गाचे काँक्रीट रोडचे लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते त्यानुसार काँक्रीट रोडच्या कामाचे टेंडर मुंबई येथील प्रायव्हेट कंपनीला देण्यात आले होते त्यानुसार सदर कंपनीने २०१७ मध्ये दोन पत्री रस्त्याला सुरुवात केली होती आणि २०१९ काम पूर्णही केले.मात्र 29 ऑगस्ट रोजी गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने पैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे तयार झालेल्या दोन पत्री रस्ता त्यापैकी एक पत्री रस्ता रण मोचन फाट्याजवळ खराब झालेला आहे त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

    353 डी राज्य महामार्ग नंबर 126/080 ब्रह्मपुरी तेआरमोरी
    मार्गावरील रनमोचन जुगनाळा फाट्यावरील राष्ट्रीय महामार्ग वाहून गेलाय आजतागायत अकरा महिने लोटून गेले मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी अद्याप रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले नसल्याने या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत.

    गोसीखुर्द प्रकल्पाचे दरवाजा उघडण्यात आल्याने मागील वर्षी आलेल्या महापुराने ब्रह्मपुरी आरमोरी महामार्गावरील रण मोचन फाट्यावर दोन पदरी असलेल्या रस्त्यांपैकी एक पत्री काँक्रीट रोड पूर्णता पडून गेल्याने करणाऱ्या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे जवळपास 400 मीटर एक पदरी रस्ता पूर्णता पुरात वाहून गेला आहे रात्रीच्या वेळी मोटारसायकलने प्रवास करताना अनेक प्रवाशांचा सदर ठिकाणी अपघात झाला असून लोकांना अपंगत्व आले आहे तर दोघांचा या ठिकाणी जीवनी गेला आहे 11 महिन्याचा कालावधी लोटूनही सदर रस्ता दुरुस्ती झालेला नसून रस्त्यावर मोठे मोठे दगड मांडलेली आहेत त्यामुळे प्रवाशांना अधिक अडचण निर्माण होत आहे शिवा या दगडांना मोटरसायकल लागून अपघाताचे प्रमाण वाढत आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर यांनी लक्ष दिले नसल्याने रस्ता दुरुस्तीचे आजतागायत काम रखडले आहे अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सदर
    राष्ट्रीय महामार्गावरील रोडवर असलेले दगड त्वरित उचलून रस्ता दुरुस्तीची मागणी आता बहुसंख्य नागरिकांकडुन होत आहे.