उमरखेड येथुन कोकण पुरग्रस्तांसाठी पाठविली 93,502 रुपयाची मदत राशी

    39

    ?जमाअत ए इस्लामी हिंद महाराष्ट्र चे रिलीफ कार्य सुरूच

    ?पुरग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी २ कोटी प्रदान करणार -प्रदेश अध्यक्ष रिजवान खान यांची घोषणा

    ✒️सिध्दार्थ दिवेकर(उमरखेड,तालुका प्रतिनिधी)मो.9823995466

    उमरखेड : दि 19 अगस्ट कोकण व प . महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक जमाते इस्लामी हिंद शाखे तर्फे 935O2 रुपये संघटनेच्या जनसेवा विभागाअंतर्गत नोंदणीकृत आयडीयल रिलीफ कमेटी ट्रस्ट ( IRCT ) च्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले .जमातचे प्रदेशाध्यक्ष रिजवार्नू रहमान खान आणि जमीर कादरी यांनी नुकताच कोकणमध्ये चिपळून, महाड आणि जवळपासच्या प्रभावी गावांचा दौरा केला आणि संघटनेच्या कार्यकर्ता मार्फत करण्यात येत असलेल्या कार्याचा आढावा घेतला .

    त्यांनी पीडितांच्या भेटी घेतल्या त्यांना आश्वासन दिलेन की या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्यासोबत उभे असल्याचे सांगत खान यांनी यथासंभव सहयोग करु असे म्हटले.सामाजिक कार्यकर्त, विभिन्न राष्ट्रीय संघटना आणि गैर सरकारी संघटनां च्या पदाधिकाऱ्यांना सोबत पुनर्वसन संबंध बैठक घेण्यात आली.

    पुरग्रस्त सहायतेपासून वंचित राहणार नाही. यासाठी प्रदेशाध्यक्ष खान पुरपिडीतांच्या पुर्नवसनाकरिता सामाजिक संघटनांनी सल्लामसलत व आपसी परामर्शाने कार्य करावे अशी भावना व्यक्त केली.याप्रसंगी जमाअत ए इस्लामी हिंद महाराष्ट्र पुरग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी २ कोटी रुपये प्रदान करेल अशी घोषणाही खान यांनी केली. ज्या लोकांचे व्यवसाय उद्धवस्थत झाले त्यांना बहाल करणे, ज्यांची घरे नष्ट वा क्षतिग्रस्त झालीत त्यांची दुरुस्ती -निर्मिती केला जाईल, यासाठी सर्वेक्षणाचे कार्य सुरू करण्यात आल्याचेही खान म्हणाले .पुरानंतर महामारीची शंका असते त्यासाठी मेडीकल कम्पचे आयोजन करण्यात आले असून याचा हजारो रुग्ण लाभ घेत आहेत. घरांच्या स्वच्छतेची सामुग्री , बोटल बंद पाणी, अन्नाचे पाकीट, कपडे, ब्लयंकेट,एमरजंसी लाईट, बॅटऱ्या, विहिरीव पाण्याचे टाके सफाई, आर्थिक मदत वितरित करण्यात आली .

    जमाअ़त ए इस्लामी महाराष्ट्राने सर्व दानकर्तांना आवाहन केले की, कोकन बाढ़ प्रभावितांची उघड हाताने मदत करावी .आपण आपले एनईएफटी , आरटीजीएस , डीडी और चेक ” आइडियल रिलीफ कमेटी महाराष्ट्र ट्रस्ट , स्टेट बैंक ऑफ इंडिया , जैकब सर्किल (मुंबई ) ब्रांचA/c. No. 30026552256 ब्रांच कोड 01835 आई एफ एस सी कोड , एस बी आई एन 0001835 या वर पाठवून या पुण्य कार्यात सहभाग नोंदवावा.