अँड.अजित देशमुख यांच्या कोरोना काळातील कार्याची “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड,लंडन” ला नोंद

    41

    ✒️बीड विशेष प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

    बीड(दि.19ऑगस्ट):-आण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार निर्मलून समितीचे बीड जिल्हाध्यक्ष अँड.अजित देशमुख यांनी कोरोना काळात १२५ कोविड सेंटरला भेटी दिलेल्या आहेत.थेट कोरोना वॉर्डात प्रवेश,६००० कि.मी.प्रवास केलेला असून ६१०० पेक्षा जास्त रुग्णांशी संपर्क,रुग्ण आणि नातेवाईकांशी चर्चा,हे सर्व जीव मुठीत घेऊन,आणि तेही सर्व स्वखर्चातुन,कोरोनाग्रस्तांना यातून मिळालेला आधार या सर्व घटनाक्रमांची दखल घेत त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल आदरणीय अण्णा हजारे,वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड,लंडन चे राष्ट्रीय सचिव डॉ.दिपक हारके यांच्या शुभहस्ते वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड,लंडन चा हा पुरस्कार दि.१९ आँगस्ट २०२१ रोजी प्रदान करण्यात आला.

    कोरोना काळात लॉकडाऊन मुळे लोक घरात असताना जिवाची पर्वा न करता त्यांनी लोकांशी संवाद साधला,कधी कधी त्यांनाही भीती वाटायची,पण एवढं करूनही त्यांनी कोरोनाला दूर ठेवलं,त्यांना कोरोनाची लागण झाली नाही.हे विशेष.या कामात त्यांना अनेक अधिकारी,डॉक्टर,नर्स,वार्ड बॉय यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले त्यामुळे आरोग्य विभागातील कोरोना योद्धांचे योगदान किती मोलाचे आहे याचीही प्रचिती त्यांना जवळून पहाता आली.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.