डाॅ. बाबासाहेब आंबेडकय जिवन प्रकाश योजनेअंतर्गत महावितरण कडुन बुलढाणा जिल्हामध्ये आतापर्यत फक्त दोन विज कनेक्शन

30

🔸माहिती अधिकारात सदर बाब उघड

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

शेगांव(दि.24ऑक्टोबर):-बुलढाणा जिल्हासह शेगांव तालुक्यामध्ये अनुसुचित जाती -जमातीच्या नागरिकांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जिवन प्रकाश योजने अंतर्गत मोफत विज कनेक्शन देण्याबाबत दि. 12 एप्रिल 2021 रोजीच्या शासन निर्णयात संबधीत महावितरण च्या अधिकार्‍यांना अनुसुचित जाती- जमातीच्या नागरिकांना मोफत विज कनेक्शन जोडणी करुन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत परंतु सदर शासनाच्या परिपञकाची महावितरणकडुन योग्य तसा प्रचार व प्रसिध्दी न केल्यामुळे अनुसुचित जाती जमातीचे नागरिक सदर योजनेपासुन वंचित राहत आहेत त्यामुळे महावितरणने सदर योजनेची माहिती आपल्या प्रत्येक कार्यालयात बॅनर लावुन करावी .त्यामुळे सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजु नागरिकाना घेता येईल.

सदर परिपञक शासनाने दिंनाक 12 एप्रिल रोजी काढलेले असुन सदर परिपञकाप्रमाणे याॅ योजनेच्या लाभार्थीची माहिती माहिती अधिकारात घेतली असता महावितरण कार्यालय मोताळा यांच्याकडुन सदर योजनेअंतर्गत 1 विज कनेक्शन देण्यात आले आहे तर खांमगाव महावितरण कार्यालयाकडुन खांमगाव शहरात 1 विज कनेक्शन देण्यात आले आहे अशी माहिती महावितरणकडुन महाराष्ट राज्य विज ग्राहक संघटना शेगांव तालूका अध्यक्ष अंबादास पवार यांना माहिती अधिकारात दिलेल्या कागदपञाचे अवलोकन केले असता स्पष्ट होते .