शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांनीन नवीनवाणांचा वापर करावा

26
  1. महाबीजचे आवाहन

चंद्रपूर दि. 16 जून:

 


महाबीजद्वारे खरीप 2020 हंगामाकरिता चाकोरीबद्ध उत्पादन साखळीत तयार केलेले व शासनाचे बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून पात्र नवीन तसेच प्रचलित वाणांचे बियाणे बाजारात उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनी प्रचारित वाणासोबतच विद्यापीठाद्वारे संशोधित नवीन वाणाच्या बियाण्याचा वापर करावा.नवीन वाण हे प्रचलित वाणापेक्षा उत्पादन क्षमता, रोग व किडींना प्रतिकार क्षमता इत्यादी मध्ये सरस असल्यामुळेच ते शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देण्यात येतात.

महाबीजने शासनाच्या निर्देशानुसार खरीप 2020 हंगामाकरिता नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी लागणारे सोयाबीन, धान, तूर, मूग, उडीद, हिरवळीचे खत ढेंचा बियाणे, भाजीपाला बियाणे तसेच जैविक बुरशीनाशक खते इत्यादींच्या पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले.

खरीप हंगामासाठी सुद्धा महामंडळाद्वारे नवीन वाण उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. परंतु शेतकरी बांधवांना त्याची माहिती नसल्यामुळे नवीन वाणांची संक्षिप्त माहिती शेतकरी बांधवांच्या माहितीसाठी देण्यात येत आहे.

धान पिडीकेव्ही किसान हे वाण 135 दिवसात परिपक्व होणारे असून जाण्याची पोत ही बारीक आहे. ह्या वाणाची रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत चांगली असून खाण्यास रुचकर आहे. धान पिडीकेव्ही तीलक हे वाण 140 ते 145 दिवसात परिपक्व होणार असून सदर वाण सुपर फाईन गटात मोडते. या वाणाचा भात मऊ व खाण्यास रुचकर आहे.

धान को-51 सदर वाण 105 ते 110 दिवसांत परिपक्व होणारे असून दाण्याची पोतही मध्यम आहे सदर वाण एम टी यु-1010 या वाणास उत्तम पर्याय आहे. धान डीआरआर 46 सदर बालाजी परिपक्वता 110 ते 115 दिवसांत असून दाण्याचा आकार मध्यम आहे. हे वाण आयआर 64 या प्रचलित वाणांची पर्यायी वाण ठरू शकते.

धान एमटीयु 1153(चंद्रा)- हे दाण्याची वाण असून या वाणाचा कालावधी 110 ते 125 आहे. सदर एम टीयू-1010 वाणास उत्तम पर्याय ठरू शकते.सोयाबीन एमसीएस 1188- हे वाण 101 ते 110 दिवसांत परिपक्व होणार असून उंच वाढणारे आहे. हे वाण बीपी, आरबी चार्कॉल रॉट रोगास अंशतः प्रतिकारक्षम असून उत्पादन क्षमताही चांगली आहे.

सोयाबीन एम ए यु एस162 हे वाण 100 ते 110 दिवसात परिपक्व होणारे असून हार्वेस्टरने कापणीस योग्य वाण आहे. जेएस -2029 लवकर येणारे वाण असून सदर वाणाची परीपक्वता 95 दिवसात होते. हे वाण यलो व्हेन मोजा एक रोगास प्रतिकारक, दुबार पीक व आंतरपीक पद्धतीस उत्तम आहे. विद्यापीठाद्वारे संशोधित नवीन वाहन महाबीजद्वारे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून या वाणांचा शेतकरी बांधवांनी अधिकाधिक उपयोग करून शाश्वत शेतीचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन महाबीजचे विभागीय व्यवस्थापक सुरेश गायकवाड यांनी केले आहे.