अड्याळ येथे क्रांतीसुर्य म. फुले स्मृतिदिन संपन्न….

  43

  ✒️भंडारा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

  भंडारा(दि.1डिसेंबर):-दि. 29 नोव्हेंबर.म. जोतिबा फुले विकास समिती आणि फुले दांपत्य प्रतिष्ठान विकास समिती अड्याळ यांच्या संयुक्त विद्यमाने, मौजा अड्याळ ता. पवनी येथे मा. संजय लेनगुरे सामाजिक कार्यकर्ते भंडारा. यांच्या अध्यक्षतेखाली स्मृतीदिनाचा कार्यक्रम पार पडला.

  कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. दशरथ आदे सामाजिक विचारवंत कुरखेडा, यांचे हस्ते पार पडले प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. अशोक मांदाडे सत्यशोधक विचारक, प्रा. राजकुमार देशकर मा. सुभाष मांदाडे तथा प्रमुख अतिथी मा. नंदकिशोर मोहूर्ले, श्रीमती गौरीताई शेंडे, रुपा शेंडे श्री. सुखदेव जेंगठे, श्री. पुरुषोत्तम लेनगुरे, गडचिरोली, मा. संदेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाची महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तथा दीपप्रज्वलन करून करण्यात आली. महात्मा फुले यांच्या जीवनावर स्वागत गीत रचून त्यावर नृत्य करून लहान मुलींनी श्रोत्यांचे तथा पाहुण्यांचे मन जिंकून घेतले. सर्व मार्गदर्शकांनी महात्मा फुले यांचे विचार घराघरात पोहोचवाव तसेच समाजातील अनिष्ट रूढी परंपरा
  मोडून काढून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून व जास्तीत जास्त शिक्षणावर भर देऊन आपल्या समाजाची उन्नती करावी याबद्दल ठोस असे मार्गदर्शन करण्यात आले.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्कारमूर्ती श्री.दिलीप सोनुले, उत्कृष्ट संचालन सौ. दिपाली सोनुले यांनी तर आभार प्रा. दीपक देशकर यांनी मानले.कार्यक्रमाला बहुसंख्य अड्याळ, पन्नासी, कलेवाडा , सुरबोडी, येथील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता, श्री. नरेंद्र निकुळे, ब्रह्मानंद शेंडे, अनिल शेंडे, उज्वला निकुळे मीना निकुळे रुपा नीकोडे पार्वता मोहुर्ले ,शालिनी, उषा सोनुले, रत्नमाला निकुळे, जीवन मोहुर्ले, अनिल लोंढे ,मनोहर मोहुर्ले ,शेखर मोहल्ले , नरेश गुरुनुले, प्रदीप निकुळे, राजू बोरूले, नरेश मोहुर्ले, राहुल , ममता निकुळे मनीषा वाढई यांनी अथक परिश्रम घेतले.