ओमायक्रॉनसाठी बीड जिल्ह्याचे आरोग्य विभाग सतर्क!

39

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)9075913114

गेवराई(दि.4डिसेंबर):-ओमायक्रॉनच्या अनुषंगाने बीडचे जिल्हा आरोग्य विभाग सतर्क असून परदेशातून बीडमध्ये डेरेदाखल झालेले तीन नागरिकांना केवळ सतर्कता राखण्यासाठी पाच दिवसाच्या विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी रौफ यांनी रिपोर्टरला दिली. या तिघांची चाचणी करण्यात आली आहे. त्यांना कुठलेही लक्षण नसल्याचे सांगण्यात येते.

बीड जिल्ह्यातील तीन नागरिक काल परदेशातून जिल्ह्यात डेरेदाखल झाले. अमेरिका, इंग्लंड, दुबई येथून आलेल्या या तीनही नागरिकांना सुरक्षिततेच्या अनुषंगाने मुंबई, बीड, अंबाजोगाई या ठिकाणी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

या तिघांना कुठलेही ओमिक्रॉन अथवा कोरोनाचे सिम्प्टम्प्स नसल्याचे सांगण्यात येते. केवळ सतर्कता म्हणून त्यांचे विलगीकरण करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले.