पालखीचे मिरवणूक ने “भंडाऱ्याची”सांगता

    40

    ✒️खर्डी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

    खर्डी(दि.4डिसेंबर):-अमोल कुलकर्णी दिनांक दोन डिसेंबर रोजी ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या खर्डी येथील श्री सिताराम महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पडला.दुपारी बाराच्या वेळेस पुष्पवर्षाव करत असताना वरुणराजाने ही अवकाळी हजेरी लावल्याने बऱ्याच भाविकांना पावसाचा त्रास सहन करावा लागला. यावेळी गावात आलेल्या खेळणी विक्रेते,पाळणे चालक तसेच मेवामिठाई आणि प्रासादिक दुकानांच्या व्यापाऱ्यांचे हाल झाले.दरवर्षीपेक्षा यावेळेस एसटी बसेस बंद असल्याने भाविकांची संख्या रोडावली. केवळ 25 टक्केच भाविकांनी या भंडाऱ्याला भेट दिल्याने बऱ्याच जणांचे आर्थिक घडी विस्कटली. आधीच कोरोनामुळे व्यापार मंदी असताना या उत्सवावर झालेला पावसाचा आणि एसटीच्या संपाचा परिणाम प्रकर्षाने जाणवून आला.

    पुण्यतिथीच्या वेळेस जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक, तालुक्याचे आमदार समाधान अवताडे, आमदार प्रणिती ताई शिंदे, प्रणिती ताई भालके, अभिजीत पाटील आणि राजकीय नेत्यांनी दर्शन दर्शनाचा लाभ घेतला. यावेळेस भाविकांना अन्नदान करण्यात आले.श्री सिताराम महाराज समाधी मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने आलेल्या भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.यावेळेस ग्रामपंचायतीची मात्र पावसाने दमछाक केली. अमावस्या आधल्या दिवशी पालखी नगरप्रदक्षिणा करून प्रस्थान अक्कलकोटला ठेवणार आहे, अशी माहिती पालखी ट्रस्ट प्रमुख विकास कुलकर्णी यांनी दिली.