चामोर्शी नगर पंचायतचे माजी उपाध्यक्ष व काँग्रेसचे युवा नेते राहुल नैताम यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश

    39

    ✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-98508 01314

    चामोर्शी(दि.5डिसेंबर):- चामोर्शी नगरपंचायतचे माजी उपाध्यक्ष व काँग्रेसचे युवा नेते मा. श्री.राहुल भाऊ नैताम याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री तथा आमदार मा.राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रजी वासेकर याच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज पक्षप्रवेश केला.

    राहुल नैताम व त्यांच्या असंख्य युवा कार्यकर्त्यांनी अधिकृत रित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपटा टाकून पक्ष प्रवेश केला. पवार साहेबाचे ध्येय व धोरण सामान्य जनतेच्या घराघरात पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्यात कटिबद्ध राहणार व धर्मरावबाबा आत्राम यांचा आशीर्वाद घेऊन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष भक्कमपणे उभा करून होणाऱ्या नगरपंचायत निवडणूकीमध्ये धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा चामोर्शी नगरपंचायत मध्ये सत्ता प्रस्थापित करण्याचा निर्धार त्यानी केला.

    उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस गडचिरोली निरीक्षक श्रीकांतजी शिवणकर, युवक निरीक्षक जगदीशजी पंचबुद्धे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष शाहीन भाभी हकीम, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, बबलु भाई हकीम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष योगेशजी नादगाये, कपील बागडे, सुरज श्रीरामे, प्रसाद ताजने उपस्थित होते.राहुल नैताम याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष प्रवेश मुळे चामोर्शी तालुक्यात व शहर मध्ये खऱ्या अर्थाने पक्ष वाढीस भक्कमपणे मजबुत होण्यासाठी मदत होणार व युवक संघटन पक्षाशी जोळण्याचे काम करतील असे विश्वास मा.धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केले.