संजीवनी व्यसनमुक्ती केंद्रात महापरिनिर्वाण दिन संपन्न

26

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.8डिसेंबर):-कल्याण शिक्षण संस्था नागपुर द्वारा संचालित संजीवनी व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केन्द्र तळोधी (बा.) येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्य विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले.

यावेळी केंद्राचे प्रकल्प अधिकारी एस. डी. लाडे यांनी मार्गदर्शनात म्हणाले की, भारताच्या पावनभूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले.

कार्यक्रमाला केंद्रातील कर्मचारी डी. बी. खोब्रागडे, एस. जी. मोहुर्ले, ए. एस. कुरेशी, आर. जे. फुकट, ए. एच. अलोणे, एस. डी. मशाखेत्री, पी. झेड. रामटेके, ए. बी. पाटील, डॉ. टेंभूरकर, मदन लेशपांडे, मलगाम, शेखर खोब्रागडे सूर्यवंशी आदीसह रुग्णमित्र उपस्थित होते.