मौजे चोराडे ता. खटाव येथील बौद्ध वस्तीमधील समाज मंदिरामधील अतिक्रमण काढून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी – गणेश भोसले

33

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

चोराडे,ता.खटाव(दि.8डिसेंबर):-येथील मागासवर्गीय वस्ती मध्ये समाज मंदिर असून. 1993 पासून मागासवर्गीय समाज मंदिर म्हणून ग्रामपंचायत मध्ये नोंद असून यामध्ये समाजमंदिरा शेजारील मोहन बंडू सरवणे व वैभव मोहन सरावणे गेली दोन वर्ष दमदाटी, शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी देऊन समाज मंदिरामध्ये अतिक्रमण केले आहे. तेथील समाजातील लोकांनी त्यास विरोध व ग्रामपंचायतीला लेखी पत्रव्यवहार केला असून सुद्धा अद्याप कारवाई करण्यात आली नाही.तसेच समाज मंदिराशेजारी जाणीवपूर्वक पाळीव जनावरे बांधन्यात येत आहेत‌. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

त्यामुळे गांभीर्यपूर्वक विचार करून समाज मंदिर शेजारी राहते अतिक्रमण काढून संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करान्यात यावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर दि. 20-12- 2019 रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे रिपाई कार्याध्यक्ष गणेश भोसले यांनी सांगितले.यामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदारी सर्वस्वी तहसील प्रशासनाची राहील.सदर निवेदन देताना रिपाईचे आठवले गटाचे खटाव तालुका कार्याध्यक्ष गणेश भोसले, ता.युवक अध्यक्ष नाना जाधव, दत्ता शिंदे, प्रफुल्ल ओव्हाळे, राहुल सरावणे, पोपट सरावणे, बाळू सरावणे, विशाल सरावणे, तुकाराम अवघडे, सचिन सरावणे सर्व समाज बांधव उपस्थित होते.