असंघटित कामगार काँग्रेस प्रभारी दिलीप मिश्रा यांची परळी भेट

36

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.10डिसेंबर):- मराठवाडा असंघटित कामगार काँग्रेसचे प्रभारी दिलीप मिश्रा यांनी आज परळीस भेट दिली. यावेळी त्यांचा यथोचित सत्कार काँग्रेस प्रवक्ते ॲड.संजय रोडे,इंजी.बालाजी मुंडे, उपाध्यक्ष गुलाबराव देवकर,सरचिटणीस सय्यद अल्ताफ, ओबीसी काँग्रेस तालुकाध्यक्ष जावेद शेख, शेख अख्तर, राहुल भोकरे यांचे हस्ते करण्यात आला.येथील बालाजी ट्रेडर्स मोंढा मार्केट येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना दिलीप मिश्रा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.जिल्ह्यातील व परळीतील कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की बीड जिल्ह्याला विशेषतः मजबूत करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटी सज्ज झाली असून कार्यकर्त्यांनी आता कामाला लागले पाहिजे. येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बीड जिल्ह्याला रिझल्ट द्यायचा आहे. त्याकरिता रात्रंदिवस आम्ही कामाला लागलो आहोत. आणि त्यासाठीची ही परळीतील भेट असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.या भेटी दरम्यान त्यांनी प्रभू वैजनाथाचे दर्शन घेतले.यावेळेस त्यांचे सोबत उत्तर प्रदेश काँग्रेसचे उपप्रभारी अमित मिश्रा हे त्यांचे बंधु उपस्थित होते.
यावेळी काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.