वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार

    44

    ✒️नितीन पाटील(विशेष प्रतिनिधी)

    नेरी(दि.13मे):-सामाजिक,शैक्षणिक,साहित्य,क्रीडा क्षेत्रात वैविध्यपूर्ण कार्य करणाऱ्या चिमूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानतर्फे वडसी येथे सत्कार करण्यात आला.वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे.त्यामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या तथा नैपूण्यप्राप्त व्यक्तिमत्त्वांना प्रतिष्ठान सदैव सन्मानित करीत असते.वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे मुख्य कार्यालय असलेल्या वडसी या गावात तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.राम राऊत होते.चिमूरचे आमदार कीर्तिकुमार भांगडीया,सामाजिक कार्यकर्ते प्रा.निळकंठ लोणबले,शिक्षण विस्तार अधिकारी जयंद्र राऊत,राजू पाटील झाडे,सरपंच अन्नपूर्णा मांदाळे,मनिष तुम्पल्लीवार,एकनाथ थुटे,सतिश जाधव,प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.भूपेश पाटील,सचिव सुरेश डांगे उपस्थित होते.

    तालुक्यातील परसराम नन्नावरे,अर्जून रामटेके,डॉ.लता धनराज मेश्राम,डॉ.रहमान खान पठाण,भानूदास पोपटे,हरी मेश्राम,भक्तदास शेंडे,पटवारी मोहुर्ले,विठ्ठल मेश्राम,श्रीहरी शेंडे,जनार्धन गजभिये,देवराव चांदेकर,उद्धव जांभुळे,निळकंठ गायकवाड,शंकर चौखे,सत्यवान कोकोडे,पत्रुजी बारसागडे,रामाजी केळझरकर,कृष्णाजी पाटील,रोशन बन्सोडे,गुलाब चौधरी,विठ्ठल वाढई,लटारु सुर्यवंशी यांचा सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व दुपट्टा देऊन अतिथींचे हस्ते सत्कार करण्यात आला.राष्ट्र सेवा दलाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रावण शेरकुरे यांचा सत्कार करण्यात आला.अलिकडेच कर्नाटक राज्यातील विद्यापीठाची आचार्य पदवी मिळालेले कराटेपटू सुशांत इंदोरकर यांचा सन्मान याप्रसंगी करण्यात आला.पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत विकास खोब्रागडे,प्रमोद राऊत यांनाही सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी सत्कारमूर्तींतर्फे परसराम नन्नावरे,हरी मेश्राम,रोशन बन्सोड यांनी मनोगत व्यक्त केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.भूपेश पाटील यांनी केले.संचालन सुरेश डांगे यांनी केले.आभार नितीन पाटील यांनी मानले.कार्यक्रमाला तालुक्यातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.