भारतीय डाक विभागाच्या वतीने श्री क्षेत्र निमगाव खंडोबा येथे अपघात विमा पॉलिसीचा मेळावा संपन्न

    76

    ✒️मनोहर गोरगल्ले(राजगुरुनगर प्रतिनिधी)

    राजगुरुनगर(दि.२८ जुलै):-भारतीय डाक विभाग यांच्या वतीने श्री क्षेत्र निमगाव खंडोबा तालुका खेड जिल्हा पुणे येथे अपघात विमा पॉलिसीचे वितरण करण्यात आले. यावेळी श्री.दिलीपराव मडके पोस्ट मास्तर चिंचोशी, श्री.बाळासाहेब काटकर पोस्ट मास्तर रेडवडी, श्री. बाळासाहेब माशेरे पोस्ट मास्तर कन्हेरसर, श्री. ज्ञानेश्वर शिंदे पोस्टमास्तर निमगाव खंडोबा, श्री सुरेश आवारी पोस्टमास्तर दावडी श्री.हनुमंत थोरवे पोस्ट मास्तर शेलपिंपळगाव,यांनी काम पाहिले.

    यावेळी श्री.बबनराव जगन्नाथ शिंदे अध्यक्ष जय मल्हार यात्रा व्यवस्था मंडळ, श्री. सोपानराव शिंदे संचालक, श्री तुकाराम रामचंद्र राऊत, श्री.किसन रांजणे श्री.रघुनाथ भगत श्री.हिरामण शिंदे तसेच महिला भगिनी विमल काटकर, पार्वती वायकर, सुरेखा भोंडवे, वंदना वायकर, मंदा वायकर, शारदा सातपुते व इतर माहिला भगिनी उपस्थित होते.

    यावेळी श्री ज्ञानेश्वर शिंदे पोस्टमास्टर निमगाव खंडोबा यांनी या पॉलिसीची संपूर्ण माहिती व फायदे काय आहेत ते सर्व नागरिक व महिला भगिनींना समजून सांगितली. या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी महिला भगिनींनी व ग्रामस्थांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता यावेळी १०६ ग्रामस्थांची विमा पॉलिसी काढण्यात आली..श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा पोस्ट ऑफिस तर्फे येनार्या सर्व ग्रामस्थ यांची वार्षिक ३९९रुपयात अपघात विमा पॉलिसी काढण्यात येईल असे निमगाव खंडोबाचे पोस्ट मास्तर श्री.ज्ञानेश्वर शिंदे यांनी सांगितले. ———-