कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल ,ः-अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे

94

🔹पोळा व गणेश उत्सवाच्या पार्शवभूमीवर नायगाव येथे शांतता समिती बैठक

✒️नायगाव प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)

नायगाव(दि.26ऑगस्ट):-सण उत्सव साजरे करतानाआनंद व मस्तीत करा पण शिस्तित भंग होऊ देऊ नका. गणेशोत्सव च्या काळात उपक्रम व देखाव्यात स्पर्धांचे आयोजन करून गणेश उत्सव हा राष्ट्रीय एकात्मता बरोबरच सामाजिक उपक्रमानी सर्वांग सुंदर कसा होईल याची दक्षता गणेश मंडळ व प्रशासन यांनी घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी केले ते नायगाव पोलीस स्टेशन मध्ये शांतता समिती बैठकीत मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत अर्थात गणेश उत्सवाच्या व पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर नायगाव पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन गुरुवार 25 आगस्ट रोजी सायंकाळी 5 वा करण्यात आले होते. यंदाचा गणेशोत्सव आणि पोळ्याचा सण शांततेत साजरा करा आणि आपल्या गणपती बाप्पाला डीजेचा कर्कश आवाज ऐकविण्याऐवजी अकरा दिवस आरती, पुजा-अर्चा करुन भक्तीभावाची जोपासना करा आणि यंदाचा गणेशोत्सव आणि पोळ्याचा सण शांततेत साजरा करा असे आवाहनबिलोली उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी केले.

या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,बिलोली उपविभागाचे आयपीएस अधिकारी अर्चित चांडक,नायब तहसीलदार संतोष देवराये,गट विकास अधिकारी एल डी. वाझे साहेब,नगरपंचायत नगराध्यक्षा प्रतिनिधी नारायण जाधव,नायगाव पोनि अभिषेक शिंदे,रामतीर्थ ठाण्याचे सपोनि संकेत दिघे, कुंटुर ठाण्याचे सपोनि महादेव पुरी, अधीक्षक संतराम ,ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रावसाहेब पोहरे, महावितरण चे गणेश दंडगव्हाळ सांबावि चे उपअभियंता भगत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

प्रस्ताविकात बोलताना पोनि अभिषेक शिंदे म्हणाले की कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे कुठे काही अनूचित प्रकार घडण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिसांना फोन करा, लगेच कारवाई केली जाईल अशी गवाही देत मागील दोन वर्षांच्या कोरोना परिस्थिती नंतर यंदाचा गणेश उत्सव उत्साहात साजरा होत असताना पोलीस बंदोबस्त चोख ठेवला जाईल,असेही शिंदे यांनी सांगितले.

सद्गर शांतता समिती ची बैठक पोलीस स्टेशन च्या प्रांगनांत पार पडली. यावेळी बाळासाहेब पांडे,शिवाजी पनासे,रवींद्र भालेराव,प्रकाश हणमंते,प्रतिष्ठित व गणेश भक्तांनी आपापल्या सूचना मांडल्या आणि मनोगतातून विविध सामाजिक उपक्रम व गणेश विसर्जन देखावा स्पर्धा ठेवण्याची सुचना मांडली, रक्तदान,आरोग्य शिबीर,आदी राबवून गणेश उत्सव साजरा करावा असे ही सांगितले.

या बैठकीला पोलीस स्टेशन च्या हद्दीतील तंटामुक्ती अध्यक्ष , सरपंच ,पोलिस पाटील, यांच्यासह , मांजरम ,गडगा, कोलंबी,टेम्भुर्णी पिंपळगाव,दरेंगाव मोकासदरा, रातोळी , गोदमगाव पळसगाव,लालवंडी,होटाळा,खंडगाव,मरवाळी,आदी गावच्या सरपंच पोलीस पाटील व गणेश भक्त व गावकऱ्यांसह, अध्यक्ष, व गणेश: मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन वसंत माने सर यांनी केले तर आभार शिवकुमार बाचावार यांनी मानले बैठक यशस्वीतेसाठी फौजदार शिवकुमार बाचावार, संदीप कुलकर्णी,आनंद वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल सोपान वळगे ,पोका इंगोले, शेख गफूर, आदींनी परीश्रम घेतले.