भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने विविध पदके पटकविणाऱ्या खेळाडूंचा सत्कार

    36

    ?राज्यस्तरीय स्किल डो मार्शेल आर्ट स्पर्धेत यश व मिलिंद दांडेकरने पटकविले स्वर्णपदके

    ✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

    पुसद(दि.4ऑक्टोबर):-पाचवी राज्यस्तरीय स्किल डो मार्शल आर्ट अजिंक्यपद स्पर्धा २०२२ सोलापूर येथे २ ऑक्टोंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत मिलिंद कृष्णा दांडेकर राहणार बांशी यांनी २ सुवर्णपदक व यश भास्कर दांडेकर राहणार चोंढी यांनी १ सुवर्णपदक, १ रौप्यपदक ,१ कांस्यपदक पटकविले.तसेच सौरभ विजय धुळध्वज राहणार पुसद यांनी अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत ७२ किलो वजन गटात रौप्यपदक मिळवल्याबदल यांच्या यशाबदल भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांच्या जाहीर सत्काराचे पारामिता बुद्धविहार महावीर नगर येथे आयोजन करण्यात आले होते.

    या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष ,माजी सैनिक भारत कांबळे तर प्रमुख अतिथी म्हणून भोलानाथ कांबळे माजी जि. प. सदस्य, राजेंद्र नाईक माजी पोलीस अधिकारी, भारतीय बौध्द महासभा शहराध्यक्ष ल.पु.कांबळे, विशाल कांबळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

    या मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ल.पु. कांबळे यांनी केले. यानंतर यश दांडेकर, मिलिंद दांडेकर ,सौरभ धुळध्वज यांचा पुष्पगुच्छ शाल बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

    यावेळी सत्कारमूर्तीने व त्यांच्या पालक वर्गाने आपले मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी राजेंद्र नाईक ,भोलानाथ कांबळे,भारत कांबळे यांनी मार्गदर्शनपर भाषण करून ६६ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व पारामिता महिला मंडळ महाविरनगर चे सर्व पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद खडसे यांनी केले तर आभार ज्योतीताई कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.