महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्पमुदत पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याना कधी मिळणार

18

🔹शेतकरी राजा प्रतिक्षेत

🔸तारींख पे तारीख,पंरतु सरकारचे धोरणच कळेना

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.11नोव्हेंबर):-राज्यातील 28.14 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार होते पंरतु त्यासाठी राज्य सरकारने फक्त 10 हजार कोटींची तरतूद केली असून, 3 टप्प्यात हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत.असे सरकारकडु व राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात चार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग केले असल्याचे कळत आहे.पंरतु दिवाळीनंतर पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर होणार होती. मात्र, आता या शेतकऱ्यांना अनुदानासाठी वाट पाहावी लागणार असल्याचे दिसते.अनुदान आचारसंहितेच्या कचाट्यात दिसत आहे कारण जवळपास राज्यातील 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला.

या निवडणुकीसाठीच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदानही आचारसंहितेच्या कचाट्यात अडकले आहे. अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आता दोन महिने पैशाची वाट पाहावी लागू शकते.खरं तर दिवाळीआधीच हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगितले जात होतं. चालू हंगामात या अनुदानाचा उपयोग होणार असल्याने शेतकरी अनुदानाची प्रतीक्षा करीत होते. मात्र, निवडणूक आचारसंहितेमुळे 2019 च्या घोषणेचे पैसे 2023 मध्येच पदरात पडू शकतात. त्यामुळे अनुदानास विलंब होणार असल्यास त्यावरील व्याज शेतकऱ्यांना देण्याची मागणी होत आहे.

अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीतील आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली आहे. दुसरी यादी जिल्हानिहाय टप्प्याटप्प्याने सार्वजनिक होत आहे. दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांनी आधार प्रामाणिकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, आता हे अनुदान लटणार असल्याचेच दिसते..