पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघामध्ये सहभागी व्हा : जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे

31

🔸लातूर शाखेच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा

✒️लातूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

लातूर(दि.11जानेवारी):- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा लातूरच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लातूर जिल्ह्यातील पत्रकारांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघामध्ये सहभागी व्हावे असे सर्व पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले.

यावेळी संघाच्या राज्य महिला अध्यक्षा डॉ.सुधाताई कांबळे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना असून संघटना वाढीसाठी सर्वांनी सहकार्य करणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर यांनी मराठवाडा दौरा काढून सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. तर लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांनी संघटना वाढीसाठी प्रत्येक तालुक्यात भेटीगाठी घेऊन सदस्य नोंदणी करण्यास सुरूवात करणार असल्याचा मानस व्यक्त केला. तसेच जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी राज्य महिला अध्यक्षा सुधाताई कांबळे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, जिल्हाध्यक्ष लहूकुमार शिंदे, लातूर जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, उपाध्यक्ष महादेव पोलदासे, प्रसिद्धीप्रमुख संतोष सोनवणे, वास्तववेदचे संपादक राजाभाऊ जाधव, फिरोज मुजावर, पठाण आय. एफ. आदी मान्यवर उपस्थित होते.प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर जिल्हा कार्यकारिणीत सहभागी होण्यासाठी *99222 38952* या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क साधावा असे संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांनी आवाहन केले आहे.