रुचिका शेषकर हिचे सीबीएसई बारावीच्या परीक्षेत सुयश

    41

    ✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चिमूर(दि.14जुलै):-येथील रुचिका सुभाष शेषकर हिने नुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएसई बारावीच्या परीक्षेत ९२.२० टक्के गुण प्राप्त करून सुयश मिळविले आहे. ती ईरा इंटरनँशनल स्कूल बुट्टीबोरी येथे शिक्षण घेत आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य दर्गन, शिक्षक, समन्वयक शंभू पटेल, भूमी महुया, मोठी ताई, आई वंदना शेषकर व वडिल सुभाष शेषकर यांना दिले आहे. तिने भविष्यात वैद्यकीय क्षेत्राचे शिक्षण घेण्याचे ठरविले आहे.

              तिच्या यशाबद्दल प्राचार्य डॉ. शुभांगी वडस्कर, डॉ. अश्विनी रोकडे, किरण उमरे, अर्चना कोहाड, राजना मोडके, डॉ. संजय पिठाडे, डॉ. चंद्रभान खंगार, प्रा. संजय साखरकर, डॉ. सुरेश मिलमिले, प्रमुख कार्यवाहक भिमराव ठावरी, डॉ. संजय बोढे, प्रा. हेमंत वरघने, निशिकांत मेहरकुरे, गणपत खोबरे, रामदास ठुसे, प्रमोद खांडेकर, विनोद खांडेकर, प्रा. दुर्गे, डॉ. सुनील झाडे, प्रा. विजय फुकट, राजू लोणारे, पद्माकर मोडक, अफरोज रुस्तम पठाण, माजी प्राचार्य डॉ. अंथोनी, प्राचार्य सुधीर पोहनकर, रंगनाथ बांगडे, अरुण पाटील, मालती खांडेकर, मराठा सेवा संघ शाखा चिमूर, कुणबी समाज संघ चिमूर, चिमूर तालुका ग्रंथालय संघटनाने अभिनंदन केले आहे.