अचलपूर येथे अवैधरीत्या गांजाची तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई

31

🔺पोलीस अधीक्षक यांचे विषेश पथकाची कारवाई

✒️शेखर बडगे(अमरावती,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905

अमरावती(दि.21जुलै):-जिल्ह्यातील पो.स्टे. सरमसपुरा अचलपूर येथे अवैधरीत्या गांजाची तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली असून आरोपी नामे जीशान अली उर्फ शूटर राहणार अचलपूर व अन्य दोघे पोलिसांवर दगडफेक करून पळून गेले. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
        दि. 21 जुलै रोजी पोलीस स्टेशन सरमसपुरा हद्दीत प्रो रेड व अवैध धंद्यांवर कार्यवाही करिता पेट्रोलिंग करीत असताना,गुप्त माहीतीदाराकडून खबर मिळाली की, एक इसम आपल्या ताब्यातील मारुती ओमनी व्हॅन मध्ये गांजाची तस्करी करीत आहे. वरून सरमसपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील रेल्वे रूट जवळ नाकाबंदी केली, ग्राम हरम कडून अचलपूर कडे येताना एक मारुती ओमनी व्हॅन निळा रंगाची गाडी क्र MH 37 A 0459 मधून अंदाजे अकरा किलो गांजा किंमत अंदाजे 1 लाख 32 हजार रुपये किंमत व मारुती ओमनी व्हेन किंमत अंदाजे 1 लाख 60 हजार रुपये असा एकुन किंमत 292000/-रुपयेचा मुद्देमाल जप्त केला.

     पुढील कार्यवाही पो.स्टे. सरमसपुरा येथे सुरू आहे. आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करून वाहन सोडून पळून गेले आहेत,आरोपींचा शोध सुरू आहे.
          सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन साहेब यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय आखरे, हेड कॉन्स्टेबल विजय अवचट,ना.पो.सी.रवी बावणे ,सय्यद अजमत,स्वप्नील तवर , पो.का.पंकज फाटे,म.पो.का .सारिका रेवाळे, चालक वशिम शहा, करीत आहे.