संकल्प बहुउद्देशीय संस्था पारस यांच्यातर्फे काॅन्सेलर ऑड सायकोथेरेपीस्ट सौ. कल्याणी नंदेश्वर (पाटील) यांना समाजरत्न पुरस्कार 2023 जाहीर

    80

    ✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

    पुसद(दि.30सप्टेंबर):-सामाजिक कार्याची प्रचंड आवड असलेल्या अशा कल्याणी नंदेश्वर (काॅन्सेलर ऑड सायकोथेरेपीस्ट), समाजासाठी आपण काय करू शकतो, सामाजिक समस्या काय असतात त्यावर यानी अभ्यास केला तेव्हा त्यांना लक्षात आले समाजामध्ये खुप लोकं छोट्या छोट्या समस्यांमुळे अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये जिवन जगत असतात. काही लोकांना बोलायला कोणी नसतं, तर काहीं कडे ऐकणारा कुणी नसतो. अश्या परिस्थिती खुपदा बघायला मिळतं कि समस्यांना कंटाळून लोकं जिवनही संपवतात, तर काही त्रासामध्ये जिवन घालवतात. यावर उपाय म्हणून आपन काय करू शकतो. ह्या विचाराने करून कल्याणी यांनी आपले शिक्षण (काॅन्सेलींग ऑड सायकोथेरेपी) मध्ये पूर्ण केले. आणि एका वेगळ्या पद्धतीने समाजातील लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली.

    कल्याणी ह्या कोरोनाच्या अतिशय भयंकर परिस्थितीमध्ये लोकांच्या समस्या, त्यांचे एकटेपन, त्यातुन त्यांना होणारा त्रास. अश्या लोकांशी फोनवर संवाद साधून कित्येक लोकांना माणसिकरित्या कस मजबुत राहायचं, मानसिक त्रासातून, तसेच एकटं वाटण्यापासून त्यांना दूर ठेवण्याची कल्याणी यांची धडपड कौतुकास्पद होती. कोरोना काळामध्ये कोणीही जवळ नसतांना किंवा भरपूर असे लोक होते की ते एकटे पडले होते त्यांना कसे समस्यांना तोंड द्यायचे आणि आनंदी राहायचे हे संवाद साधून त्यांना मानसिक आधार देण्याचे कार्य केले. त्यानंतर त्यांनी स्वतःचे क्लिनिक कल्याण काउंसिलिंग अँड सायकोथेरपी क्लीनिक सुरू केले. आज त्या क्लिनिक च्या माध्यमातून येणाऱ्या करिअर समस्या, वैयक्तिक समस्या, विवाहपूर्व किंवा विवाहा नंतर येणाऱ्या विविध समस्या वैयक्तिक होणारा त्रास, चिंता आणि तणाव निर्माण होणार्या लोकांना मदत करून त्यांना त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात.

    त्यासोबतच वेळात वेळ काढून समाजकार्यात अजून भर म्हणून कल्याणी ह्या संकल्प मॅरेज ब्युरोच्या कार्याला पुढे नेण्यास हातभार लावून समाजातील मुला-मुलींचे लग्न जुळवण्यात लोकांची मदत करत असतात. अश्या या प्रखर स्वभावाच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन संकल्प बहुउद्देशीय संस्था पारस यांच्यातर्फे समाजरत्न पुरस्कार 2023.रोजी प्रदान केला जाणार आहे सौ. कल्याणी नंदेश्वर (पाटील) यांना 14 ऑक्टोबरला देण्यात येणार आहे.