दुय्यम निबंधक विभागातील जिल्ह्यातील भारतीय दंड संहिता अनधिकृत फलक काढले-विश्वास मोहिते यांच्या अभ्यासपूर्ण भूमिकेला जिल्ह्यातून प्रतिसाद

641

✒️सातारा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

सातारा(दि.6ऑक्टोबर):- सातारा जिल्ह्यातील दुय्यम निबंधक विभागाच्या तालुकास्तरीय कार्यालयात भारतीय दंड संहिता फलक बेकायदेशीर लावण्यात आले होते. मात्र हे फलक बेकायदेशीर असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाडळी (केसे) तालुका कराड येथील सामाजिक कार्यकर्ते, आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन हे फलक काढण्यास सांगितले आहे त्यामुळे दुसऱ्या अभ्यासपूर्ण एका विषयातील भूमिकेबद्दल विश्वास मोहिते यांचे सातारा जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

दुय्यम निबंधक विभाग( दस्त नोंदणी कार्यालय) तालुकास्तरावरील कार्यालयांमध्ये नागरिकांनी दंगा केल्यास, नागरिकांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्यास किंवा शासकीय कामात अडथळा केल्यास कारवाई केले जातील अशा पद्धतीत असणारे भारतीय दंड संहिता फलक हे बेकायदेशीर असल्याचे विश्वास मोहिते यांनी सहज जिल्हा निबंधक यांच्या निदर्शनास आणून दिले होते. सातारा जिल्हा सहनिबंधक यांच्या निदर्शनास आल्यानंतर काल पाच ऑक्टोबर 2023 रोजी सातारा जिल्हा सहनिबंधक कार्यालयातून तालुका स्तरावरील कार्यालयांना सक्त सूचना देऊन ते फलक काढण्यात सांगण्यात आले आहे. याचं प्रचिती म्हणून कराल दुय्यम निबंध कार्यालय कराड क्रमांक दोन मधील ही फलक हटवण्यात आला आहे. विश्वास मोहिते यांच्या या अभ्यासपूर्ण आणि जनहिताच्या भूमिकेबद्दल सातारा जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

*अधिकाऱ्यांना जी माहिती नव्हतं ते विश्वास मोहितेंना होतं …..*

आज पर्यंत सरकारी कार्यालयामध्ये भारतीय दंड संहिता हे फलक बेकायदेशीर लावण्यात येत होते. त्याचप्रमाणे दुय्यम निबंधक या विभागातील सातारा जिल्ह्यातील तालुकास्तरीय कार्यालयात ही फलक होते. आज पर्यंत फलक काढण्यात आले होते विश्वास मोहिते यांनी अधिकाऱ्यांशी केलेली चर्चा, केलेली तक्रार विचारात घेता फलक काढले म्हणजे विश्वास मोहिते यांना माहिती होतं पण यापूर्वी अधिकाऱ्यांना नव्हतं की काय अशी चर्चा सध्या आहे.