प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते

272

🔸ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार प्रा. अतुल भाऊ देशकर यांची प्रमुख उपस्थिती

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपूरी(दि.19ऑक्टोबर):-केंद्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रम दिनांक गुरुवार 19 ऑक्टोबर 2023 ला सायंकाळी चार वाजता भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान.नामदार एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मान. नाम. देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री मान. नाम.अजित पवार आणि महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री श्री. मंगलदास लोढा हे या ऑनलाइन उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

या ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रमाचे स्थळ त्रिनेत्र पदुम कृषी व ग्रामीण शिक्षण संस्था अंतर्गत लोकार्पण कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, लोकार्पण महाविद्यालय वार्ड नं 3 गांगलवाडीता.ब्रह्मपूरी,जि.चंद्रपूर. येथे आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाला ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लाडके माजी आमदार आदरणीय प्रा. अतुल भाऊ देशकर हे प्रमुख उपस्थित राहणार असून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रा.कादर शेख, ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य प्रा.प्रकाश बगमारे डॉ.गोकुळ बालपांडे, तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, शहराध्यक्ष अरविंद नंदुरकर, भाजपा ओबीसी आघाडी शहराध्यक्ष डॉ.प्रा.अशोक सालोटकर,भाजयुमो तालुका अध्यक्ष रामलाल दोनाडकर, भाजयुमो शहराध्यक्ष प्राचार्य सुयोग बाळबुध्दे,भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री मनोज भूपाल, नगरसेवक मनोज वठे, भाजपा तालुका महामंत्री ज्ञानेश्वर पा. दिवटे,इ. मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

भाजयुमो जिल्हा सचिव तनय देशकर,अनुसूचित जमाती मोर्चा तालुकाध्यक्ष राजेश्वर मगरे, जिल्हा सचिव माणिक पाटील थेरकर, ज्येष्ठ नेते साकेत भाऊ भानारकर,भाजपा महिला आघाडी उपाध्यक्षा वंदनाताई शेंडे, माजी सरपंच ज्ञानेश्वर भोयर, सरपंच अनिल तिजारे सरपंच उमेश घुले, सरपंच हेमंत ठाकरे,उपरपंच देवराव नन्नावरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर दादा सातपुते,उपसरपंच सदाशिव ठाकरे, भाजपा विमुक्त भटक्या जमीन समिती तालुका अध्यक्ष राजू शिवूरकर इत्यादी मान्य उपस्थित राहणार आहेत. तरी परिसरातील जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा प्रसिद्धी प्रमुख तथा कार्यालय प्रमुख प्रा.संजय लांबे यांनी केले आहे.