ग्रामसभा बळकट करण्यासाठी व्यवस्थापन आराखडा काळाची गरज- रजनीताई घुगरे

158

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि.2नोव्हेंबर):-नागभीड तालुक्यातील सामूहिक वन हक्क दावा मिळालेल्या गावांना व्यवस्थापन आराखडा कसा तयार करायचा त्याबद्दल रिवार्ड संस्थेमध्ये तीन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. हा प्रशिक्षण समाज प्रगती सहयोग धारणी व रिवार्ड संस्था नागभीड यांच्या सहकार्याने घेण्यात आला. त्यामध्ये सौ रजनीताई घुगरे सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समन्वयक उपविभागीय कार्यालय ब्रह्मपुरी यांनी ग्रामसभा बळकट करण्यासाठी व्यवस्थापन आराखडा काळाची गरज आहे असे ग्रामसभा पदाधिकाऱ्यांना सांगितले.

नागभीड येथे रिवार्ड कार्यालय मध्ये दिनांक 25 ऑक्टोंबर ते 27 ऑक्टोबर 2023 दरम्यान तीन दिवशीय प्रशिक्षण घेण्यात आले .तालुक्यातील 54 गावांना सामूहिक वन हक्क दावे मिळाले आहेत .त्यामध्ये रिवार्ड संस्थेच्या मार्गदर्शनाखाली 30 गावांना जल, जंगल, जमीन आणि सामूहिक दावे मिळालेल्या जागेवर रोजगार कसा प्राप्त करायचा याबद्दल नेहमी मार्गदर्शन केले जाते. व्यवस्थापन आराखडा तयार करून लोकांना रोजगार कसा देता येईल आणि आराखडा कोणत्या प्रकारे तयार करायचा याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी कुरखेडा येथील ग्राम आरोग्य संस्थेचे अध्यक्ष रुपचंद दखणे, रिवार्ड संस्थेचे संस्थापक गुणवंत वैद्य, उपविभागीय कार्यालय ब्रह्मपुरीचे समन्वयक सौ रजनीताई घुगरे यांनी व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी गावाने कोणते कार्य केले पाहिजे आणि त्यापासून मिळणारे फायदे याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले.

जंगलापासून मिळणाऱ्या गौण उपज वस्तु पासून रोजगार कोणत्या प्रकारे प्राप्त करता येईल याबद्दल गुणवंत वैद्य यांनी बारा गावच्या ग्रामसभा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
हा प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी श्री भोजराज नवघडे ,कैलास नन्नावरे, प्रफुल मसराम, सुनिता गाटे यांनी मोलाचे सहकार्य केले.