विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर यांच्या खुणाची सुपारी(?)

156

🔹हॉटेल चालक व मालक जवाबदार

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.4नोव्हेंबर):- हॉटेल टुरिस्ट प्रकरणी 14 अनधिकृत खोल्या व स्टुडिओ निष्काशीत करणे संबंधित तक्रार दिल्यामुळे टुरिस्ट हॉटेल चे मालक के. अशोक राय यांच्या कडून हॉटेल चालक रवींद्र शेट्टी प्रत्यक्ष भेटून तक्रार मागे घेण्यास सांगितलं. नकार दिल्यामुळे ठाण्यातील गुंडाणा खुणाची सुपारी दिली असल्याची तक्रार विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी पोलीस कमिशनर यांना दिली आहे.

सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे मुख्य संपादक समाजभूषण डॉ. राजन माकणीकर यांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, टुरिस्ट हॉटेलचे मालक के. अशोक राय यांच्या सांगण्यावरून अधिकृत चालक रवींद्र शेट्टी नावाची व्यक्ती भेटावयास आली होती. यावेळी ते एकटे असल्याचे भासवत होते मात्र ते एकटे नसून असंख्य गुंडान्ना घेऊन आले होते, लांबूनच माझी चेहरापट्टी करून दिली.

दुसऱ्या भेटीवेळी हॉटेल टुरिस्ट चे चालक श्री रवींद्र शेट्टी भेटायला आले त्यावेळी एका गावगुंडाला सोबत आणले होते. भेटीला आले त्यावेळी मात्र ते मैत्री करू असे बोलले पण सोबत आणलेला दारूच्या नशेत असलेला दीड क्विंटल चा जाडजूड गुंड मात्र… माझ्याकडे रागात बघत होता. तो मला बोलला मच्छी आणि खेकडा विक्रेता आहे. असे डॉ. माकणीकर म्हणाले.

मी त्यावेळी रवींद्र शेट्टी यांना बोललो की, “येह पहिलवान मुझे मारणे लाये हॊ क्या?” पण ते म्हणाले, नाही सोबत आलाय फक्त.

मी त्यांना स्पस्ट सांगितलं वाईट काम होत आहेत तर मी माघार नाहीच घेनार माझा जीव गेला: तरी चालेल. मी आता उपोषणाला बसणार आहे. पण यावेळी ते पुन्हा म्हनाले दुष्मनी पेक्षा मैत्री बरी राहील. मला ते त्यावेळी कळले नाही. मी आता आमरण उपोषणाला बसणार असून कालपासून माझ्या अवती भवती संशयास्पद लोक फिरताना दिसत अशक्याचे संकेत माकणीकर यांनी पोलीस कमिशनरला दिले आहेत.

रवींद्र शेट्टी मला म्हणाले होते की, मी ठाण्याला राहतो मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे माझे खास आहेत. माझ्या हॉटेलची तक्रार त्यांना देऊन असं काही वेगळं होणार नाही. त्यामुळे तक्रार वापस घ्या. पण मी नकार दिला.

माझ्या परिवारातील सदस्यांना आणि मला, म्हणजेच आमच्या जीवितला आज दिनांक 3/11/2023 शुक्रवार रोजी पासून कुणाच्याही जीवाला केसालाही धक्का बसेल, आमच्या जीविताला काहीही झाले तर केवळ आणि केवळ के. अशोक राय व रवींद्र शेट्टी याला जवाबदार धरावें. असे पत्रात म्हटले आहे.

के. अशोक राय अजून मला भेटले नाहीत. पण त्यांच्या हॉटेलचा चालक रवींद्र शेट्टी भेटले आणि त्यांनी मला गोडीतच हे बर नाही काहीही होऊ शकत असं बोलले होते. यामुळे मला व माझ्या परिवारातील सदस्याला काहीही झाले तरी फक्त आणि फक्त के. अशोक राय व रवींद्र शेट्टी यांना जवाबदार धरावें. असे डॉ. माकणीकर यांनी म्हटले आहे.