मराठी नाटक: मनोरंजन आणि प्रबोधन!

68

(महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन विशेष)

दरवर्षी यादिवशीच रंगभूमीची प्रदीर्घ काळ सेवा करणाऱ्या कलावंताला विष्णुदास भावे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. मागील काही काळात रंगभूमीवर पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, मनोरंजनपर, रहस्यमय असे वेगवेगळे विषय हाताळले जाता आहेत. १७० वर्षाची ही मराठी नाटकाची परंपरा येत्या काळात आणखीनच वृद्धिंगत होत राहो ही सदिच्छा! सदिच्छा आणि प्रेरणा देणारा हा श्री एन.कृष्णकुमार यांचा महत्वपूर्ण लेख… 

प्रकाशात उजळलेला भला मोठा रंगमंच.. लाल मखमली पडदा.. म्युझिकचा मंद स्वर, नेपथ्याची लगबग.. तिसरी घंटा.. आणि तुमची परीक्षा घेण्यासाठी समोर बसलेले प्रेक्षक, हे वातावरण डोळ्यासमोर येताच कोणत्याही रंगकर्मींच्या अंगावर काटा आल्यावाचून राहणार नाही. मागील कित्येक वर्षांपासून मनोरंजन आणि प्रबोधन यांची सांगड घालत नाटक संस्कृतीचा वारसा मनोरंजन विश्वात रुजत आहे. या रुजलेल्या बीजाची एक फांदी म्हणजे मराठी नाटक. सन १८४३ साली सीता स्वयंवर या नाटकाच्या रूपात सुरु झालेला हा प्रवास अलीकडच्या संगीत देवबाभळी, अनन्या, अलबत्त्या गलबत्त्यापर्यंत दिवसागणिक आणखीनच प्रगल्भ होत चालला आहे. मराठी रंगभूमीच्या सेवेत रुजू असणाऱ्या प्रत्येक रंगकर्मीसाठी ५ नोव्हेंबर हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. या दिवशी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो, हे तर सर्वांना ठाऊक आहेच पण त्यामागील कारण आपण जाणता का? सन १८४३ मध्ये सांगली येथे मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला.

चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांनी ५ नोव्हेंबर १८४३ रोजी सीता स्वयंवर या नाटकाचा प्रयोग केला आणि तिथूनच मराठी नाटकांच्या पर्वाला सुरुवात झाली. सन १९४३ साली या दिवसाच्या स्मरणार्थ म्हणून या क्षेत्रातील सर्व नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन सांगली येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा केला. या संमेलनाचे अध्यक्ष वि.दा.सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापन करण्यात आली. यावेळी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्ह्णून घोषित करण्यात आला होता. दरवर्षी यादिवशीच रंगभूमीची प्रदीर्घ काळ सेवा करणाऱ्या कलावंताला विष्णुदास भावे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. ज्याला रंगभूमी माहिती अशा प्रत्येकासाठी जागतिक रंगभूमी दिन महत्त्वाचा आहे. मराठी रंगभूमीला जवळ जवळ १७० हुनही जास्त वर्षांची परंपरा आहे. १८४३ ला नाटकाला डोक्यावर घेतलेल्या प्रेक्षकाने आजही त्याचा भार वाजत गाजत मिरवत पुढे आणला आहे.

दरवर्षी ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. विष्णूदास भावे यांनी १८४३ साली सीता स्वयंवर हे पहिले नाटक सांगली येथे रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. १९४३ साली या घटनेचे स्मरण म्हणून राज्यातील या क्षेत्रातील सर्व नामवंत एकत्र आले आणि सांगली येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने ५ नोव्हेंबर रोजी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष वि.दा.सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापण्यात आली. चिंतामणराव पटवर्धन यांनी दिलेल्या जागेवर विष्णूदास भावे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या नाट्यमंदिराची कोनशिला बसविण्यात आली. या महत्त्वाच्या क्षणी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस जाहीर केला. मराठी रंगभूमी दिनी सांगलीची अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती सन १९६० सालापासून विष्णूदास भावे यांच्या स्मृत्यर्थ मराठी रंगभूमीवर दीर्घकाळ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराला विष्णूदास भावे गौरवपदक देऊन त्यांचा सन्मान करते. गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते.

मराठी रंगभूमी दिन ५ नोव्हेंबर रोजी का साजरा केला जातो? मागील कित्येक वर्षांपासून मनोरंजन आणि प्रबोधन यांची सांगड घालत नाटक संस्कृतीचा वसा सुरू आहे. या वटवृक्षाचे एक देखणे मुळ म्हणजे मराठी नाटक. सन १८४३ मध्ये सीता स्वयंवरने सुरू झालेला हा प्रवास आजही किमान १७० वर्षानंतरही सुरूच आहे. सीता स्वयंवर, संगीत शारदा, संगीत सौभद्र, ती फुलराणी, सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवा न्यूज आहे, एका लग्नाची तिसरी गोष्ट आणि आणखीन.गेले कित्येक वर्ष नाटक कधी थांबलं नाही कारण प्रेक्षकांनी ते थांबू दिलं नाही; काहीतरी नवं बघायला प्रेक्षक कुचारला पण म्हणून त्याने नाटकाचा हात कधी सोडला नाही. दि.५ नोव्हेंबर हा रंगभूमीवर काम करणाऱ्या प्रत्येकासाठीच फार महत्त्वाचा आहे. १८४३ मध्ये सांगली येथे मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला.

चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांनी दि.५ नोव्हेंबर १८४३ साली सीता स्वयंवर या नाटकाचा प्रयोग केला आणि तिथूनच मराठी नाटकांच्या पर्वाला सुरुवात झाली. सन १९४३ साली या दिवसाच्या स्मरणार्थ या क्षेत्रातील सर्व नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन सांगली येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा केला. या संमेलनाचे अध्यक्ष वि.दा.सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापन करण्यात आली. यावेळी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून घोषित करण्यात आला होता.

!! सर्व रंगकर्मींना मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलन -श्री एन.कृष्णकुमार.रामनगर, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- 9423714883