आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते सुसज्य अग्निशमन वाहनाचे लोकार्पण ! वरूड नगर परिषद येथे अत्याधूनिक अग्निशमन बंब दाखल !

139

 

वरूड तालुका प्रतिनिधी /
वरूड नगर परिषदमध्ये अत्याधूनिक अग्निशमन बंब दाखल झाला आहे. आमदर देवेंद्र भुयार यांच्या पाठपराव्यामुळे शासनाच्या अग्निसुरक्षा अभियान योजनेतून हे वाहन नगरपं परिषदेकडे प्राप्त झाले आहे. या बंबचा लोकार्पण सोहळा आमदत देवेंद्र भुयार यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
वरूड तालुक्यात आगी सारखी दुर्घटना घडली तर आग आटोक्यात आणण्यासाठी सुसज्य उपाययोजना कमी प्रमाणत उपलब्ध होती अग्नीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी तालुक्यात अग्निशमन बंब ची मागणी केली जात होती. अखेर आमदार देवेंद्र भुयार यांनी पाठपुरावा करत शासनाच्या अग्निसुरक्षा अभियानातून नागरिकांची मागणी पूर्ण केली आहे. वरूड नगर परिषद येथे अग्निशमन बंब दाखल होताच नागरिक व व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आधुनीक यंत्र असलेली अग्नीशामक वाहन प्राप्त झाले आहे. त्या वहनाचा वरुड मोर्शी विधान सभेचे युवा आमदार देवेन्द्र भुयार यांच्या हस्ते
लोकार्पण सोहळा पार पाडला. सन २००२ साली प्रथम माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी विदर्भ वैधानिक विकास महा मंडळा मार्फत अग्नीशामक वाहन प्राप्त करूण दिले होते. तसेच वरुड नगरी ला सांस्कृतीक
भवन चे निर्माण सुद्धाकरूण दिले होते. त्यांच्याच पावलावर पाउल टाकत आमदार देवेन्द्र भुयार यानी वरुड नगरीची वाढती लोकसंख्या पहाता अत्यंत सुसज्ज असे अग्नीशामक
वाहन प्राप्त करुण दिले व नगर परिषदेच्या ग्राउंड वर या अग्नीशामक वाहनाची अग्नीशामक ऑफिसर हर्षल दहाड व त्यांच्या टिमने प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच या
वेळी सांस्कृतीक भवनाला सुद्धा आधुनीक करण्याचे संबंधीत अधिकाऱ्यांना आदेशीत केले. या वेळी सर्व माजी नगर सेवक राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व वरुड शहराती गण मान्य मंडळी सह वरुड नगर परिषदेचे सर्व कर्माचारी
उपस्थीत होते. या वेळी आमदार मोहोदयांनी सुद्धा अत्यंत सुसज्ज असलेल्या अग्नीशामक वाहन चालऊन पाहले हे विशेष..