अहमदनगर – “शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य च्या वतीने दीपावली पाडव्या निमित्त खास काव्य रसिकांसाठी उत्सव ‘ ती ‘ च्या कवितेचा काव्यसंमेलन छत्रपती संभाजीनगर येथील प्रा.प्रिया धारूरकर यांच्या अध्यक्षतेखाली कोहिनूर मंगल कार्यालय,पाईपलाईन रोड,सावेडी येथे मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी दु ४ वा आयोजित करण्यात आले आहे,” अशी माहिती शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे व संस्थापक, सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
शब्दगंध च्या वतीने दरवर्षी दीपावली पाडव्यानिमित्त वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात येते,यावर्षी महिलांचा सन्मान करण्यासाठी उत्सव ‘ ती ‘ च्या कवितेचा हा काव्यसंमेलन चा कार्यक्रम होत आहे.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती लतिका पवार उपस्थित राहणार आहेत.
या काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन शर्मिला गोसावी,स्वाती ठुबे करणार असून कवयित्री सरोज अल्हाट,सुरेखा घोलप,प्रा.मेधाताई काळे, प्रा. सुनीता गायकवाड,ऋता ठाकूर,बेबीताई गायकवाड,मंजुश्री वाळुंज,सुवर्ण लता गायकवाड, सुजाता रासकर,ज्योती गोसावी,सुषमा भालेकर,उज्वला धस,प्रबोधिनी पठाडे,दुर्गा कवडे,समृद्धी सुर्वे,प्रांजली वीरकर,सुजाता पुरी,मीरा आर्ले,जयश्री मंडलिक,सरला सातपुते,संध्या शिंदे,शामा मंडलिक,वर्षा भोईटे, स्वाती पुरी,नीता आंधळे, स्वाती पुरी,संगीता फसाटे इत्यादी महिला कवयित्री सहभागी होणार आहेत.
तरी या कार्यक्रमास साहित्य रसिकांनी उपस्थित राहून काव्यानंद घ्यावा असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव सुनील गोसावी,डॉ.अशोक कानडे,सुभाष सोनवणे,भगवान राऊत, संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे,भारत गाडेकर,प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे, डॉ.तुकाराम गोंदकर,सुनील धस,किशोर डोंगरे,राजेंद्र पवार,रामकिसन माने,बबनराव गिरी,अजयकुमार पवार यांनी केले आहे.