बहुजनांनो, आता तरी एक व्हा!

    85

     

    जो ओबीसी की बात करेगा वही देश पर राज करेगा.हि मनुवाद्याची चलाखी आहे. ती आपण ओळखावी.हमे इसको अब बदलना है.ऐसा जो ओबीसी की बात करेगा वही ओबीसी देश पर राज करेगा.
    आपण भारतीय मूलनिवासी 85 टक्के आहोत.परंतु अजूनही आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले नाही.हे स्वातंत्र्य आहे ते फक्त मनुवाद्यांना मिळालेले आहे.आपल्या बहुजनांना याचा काहीच फायदा झाला नाही. कारण आपल्या बहुजनांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालेच नाही,ते फक्त हस्तांतर झालेले आहे.गोरे इंग्रज गेले आणि काळे मनुवादी आले.एवढाच तो काय फरक झालेला आहे.बहुजनांचे आजही शोषण,अपमान,अन्याय,अत्याचार अजूनही चालूच आहे मग आपण याला स्वातंत्र्य म्हणणार काय.उत्तर आहे नाहीच.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते की भारतामध्ये एक वेळ अशी येईल कि येथे बहुजनांचे शासन राहील. त्यांची हि दूरदृष्टी आता सत्यात उतरत आहे.म्हणून बहुजनांनो आपण 85% आहोत. एकत्र या आणि सत्ता आपल्या हातात घ्या. आपणच आपला विकास करू शकतो हे सिद्ध करून द्या.बहुजन देशाचे शासक बनू शकतात,फक्त अट आहे की त्यांनी झाडून एक व्हावे. आता गुलामीच्या बेड्या तोडा.स्वतंत्र व्हा. एक व्हा.एवढीच ही एक अट आहे.आम्ही चार भाऊ SC,ST,OBC व MINORITIES.पण आपल्या दुफळीचा फायदा आहे मनुवादी विचारसरणीचे लोक घेत आहेत. हे आता बहुजनांना चांगलेच समजलेले आहे.
    आपापल्या पक्षाचे जोखड झुगारून द्या.एका विचार मंचावर या.जनता अशा घटनेची आतुरतेने वाट पाहत आहे.सर्वांचा विचार एक आहेत,उद्देश एक आहे.आता बहुजनांनी एकत्र येऊन सत्ता हस्तगत केली पाहिजे.
    बहुजनांचे राज्य आल्यानंतर सर्वांना समान संधी मिळेल.कोणी लहान किंवा कोणी मोठा असणार नाही.आपण सारे भारतीय बांधव आहोत या उद्देशाने बहुजन शासक बनतील व सम्राट अशोका सारखा भारत निर्माण करतील. कोणीही उपाशी,बेघर,बेकार राहणार नाही याची काळजी हे बहुजन सरकार घेईल.
    डॉ.बाबासाहेबांना ही एक अमूल्य भेट द्या. बहुजनांचे सरकार बनवा. बाबासाहेब आपल्याला पहात आहेत. बहुजनांचे राज्य आल्यावर ते फार खुश होतील.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जरी शरीराने आपल्यात नसतील तरी त्यांचा तसेच सर्व महापुरुषांचा विचार आपल्या सर्वांच्या सोबत आहेच. चला तर मग बहुजनांनो एक व्हा. सर्वांनी मिळून एक पक्ष बनवा व निवडणूक लढवा. येणारे पाचशे वर्षे बहुजन हा शासक राहील याबद्दल काही दुमत नाही.
    बहुजनांचे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, संत तुकाराम, संत गाडगेबाबा,रामास्वामी पेरियार नायकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर इ. महापुरुषांनी त्याबद्दल आपले विचार व्यक्त केलेले आहेत.एवढेच नव्हे तर इतिहासानी हे सिद्ध करून दिलेले आहे,जर एकत्र आले तर काहीही होऊ शकते.जनता बहुजनांनी एकत्र येण्याची व बहुजनाने शासक बनवण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांना निराश करू नका.


    महादेव डांबरे, छत्रपती संभाजी नगर 96650 47153.