वेणूताई चव्हाण कॉलेजच्या नडशी येथील “विशेष श्रमसंस्कार शिबिराचा’ समारोप

58

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.23डिसेंबर):-२२ राष्ट्रीय सेवा योजनेचे “विशेष श्रमसंस्कार शिबिर” हे आजचा दिवस कसा उत्कृष्ट जाईल यासाठी उपयुक्त ठरेल. कराड नगरीचे शिल्पकार मा. श्री. पी. डी. पाटील साहेब यांना नडशी गावचे लोकनियुक्त सरपंच गोविंदराव कृष्णा थोरात दररोज भेट द्यायचे. नडशी गाव हे अतिशय उत्कृष्ट असून या गावची प्रगती अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आहे. “विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या” या सात दिवसात प्रबोधनपर व्याख्याने आयोजित केले. त्याचा ग्रामस्थांनाही फायदा झाला असेलच. मा. आमदार साहेब हे या समारोप समारंभाला येणार होते.

परंतु काही कामामुळे ते येऊ शकले नाहीत. त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. पुन्हा या गावाने संधी दिल्यास चार ते पाच वर्षानंतर पुन्हा याहीपेक्षा उत्कृष्ट असे “विशेष श्रमसंस्कार शिबिर” घेऊ. असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे मा.श्री. अल्ताफहुसेन नसरुद्दीन मुल्ला साहेब (जनरल सेक्रेटरी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड) यांनी वेणूताई चव्हाण कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या “विशेष श्रमसंस्कार शिबिर २०२३-२४” च्या समारोप समारंभात केले.

या “विशेष श्रमसंस्कार शिबिरास” विशेष उपस्थिती मा. श्री. अरुण पांडुरंग पाटील (काका) ,विश्वस्त व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड यांची होती.आमच्या नडशी गावात वेणूताई चव्हाण कॉलेज कराडचे “विशेष श्रमसंस्कार शिबिर” आयोजित केल्याबद्दल सरपंच अण्णांनी वेणूताई चव्हाण कॉलेजला धन्यवाद दिले. माझं नडशी गाव हे कृष्णामाईच्या मांडीवरती वसलेले आहे. थोर व्यक्तींनी माझ्या नडशी गावाचा नावलौकिक केल्याचेही त्यांनी सांगितले. नडशी, घोणशी ही गावे आमदार साहेबांच्या जवळची आहेत. या गावातील शेतापर्यंत जे रस्ते गेलेत त्यासाठी साहेबांनी खूप सहकार्य केलेले आहे. या नडशी गावावर आमदार साहेबांचे खूप प्रेम आहे. त्यांनी या गावाच्या विकासासाठी भरपूर निधी दिलेला आहे. ते म्हणाले की मी भाग्यवान समजतो.

ज्यावेळी सरपंच म्हणून निवडून आलो त्यावेळी वेणूताई चव्हाण कॉलेजचे “विशेष श्रमसंस्कार शिबिर” आयोजित केलेले होते व आज माझा पाच वर्षाचा कालावधी संपतानाही वेणूताई चव्हाण कॉलेजचे “विशेष श्रमसंस्कार शिबिर” आहे. यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. असे प्रतिपादन समारोप समारंभाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना नडशी गावचे लोकनियुक्त सरपंच मा. श्री. गोविंदराव कृष्णा थोरात यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली.त्यानंतर शिबिरार्थी विद्यार्थिनींनी स्वागत व एन.एस.एस गीत सादर केले. मान्यवरांचे स्वागत मा. प्राचार्य डॉ. एल.जी. जाधव सर यांनी केले.शिबिराला सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांचा सत्कार उपप्राचार्य श्री. आर.ए. कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. प्राचार्य डॉ. एल जी. जाधव सर यांनी केले. शिबिराचा अहवाल वाचन प्रा. श्रीमती एस. पी. पवार कार्यक्रम अधिकारी यांनी केला. प्रमुख पाहुणे व अध्यक्षांचा परिचय प्रा. ए.ए गायकवाड यांनी केला. मा. श्री. भार्गव महादेव पाटील व मा. श्री. प्रवीण पोपटराव थोरात, सामाजिक कार्यकर्ता नडशी या ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शिबिरार्थी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आभारप्रदर्शन प्रा. पी. एस. पाटील यांनी केले व सूत्रसंचालन प्रा. आर .एस .पाटील यांनी केले .यावेळी सर्व शिबिरार्थी प्राध्यापक ,प्रशासकीय सेवक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.