ॲड. कृष्णा पाटील यांच्या वाटणी कथासंग्रहाचे प्रकाशन

61

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.24जानेवारी):-ज्येष्ठ कायदेतज्ञ, साहित्यिक व कथाकार ॲड. कृष्णा पाटील यांच्या दिशादर्शक व हृदयस्पर्शी वाटणी या कथासंग्रहाचे प्रकाशन राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे पार पडलेल्या दुसऱ्या जनवादी साहित्य-संस्कृती संमेलनामध्ये राज्यसभा खासदार कुमार केतकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

कायद्याच्या कचाटीत सापडलेला माणूस कशाप्रकारे उध्वस्त होतो, त्यातून मार्ग काढतो, सावरतो आणि पुढे जातो. लोकांच्या गरिबीचा, अडाणीपणाचा, मजबुरीचा गैर फायदा उठवून त्यांच्या आयुष्याभोवती सावकारी पाश आवळू पाहणारा धनदांडगा सावकार आणि त्याच्या जुलमी जोखडातून सांविधानिक मार्गाने एका हतबल ऊस तोडणी कामगार कुटुंबाला बाहेर काढणारा न्यायनिष्ठ वकील यांच्यातील भावबंध ओघवत्या शैलीत या कथासंग्रहात रेखाटले आहेत. अशा सत्य घटनावर आधारलेला हा कथासंग्रह मानवी मूल्याची जपणूक करणारा आहे.

यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आसाराम लोमटे, संपादक दशरथ पारेकर, लेखिका संध्या नरे-पवार, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णात खोत, जनवादी साहित्य संमेलन कार्याध्यक्ष संपत देसाई, स्वागताध्यक्ष व्ही. बी. पाटील, प्रविण बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो
वाटणी कथासंग्रहाचे प्रकाशन करतांना राज्यसभा खासदार कुमार केतकर डावीकडून दशरथ पारेकर, व्ही. बी. पाटील, आसाराम लोमटे, लेखक ॲड. कृष्णा पाटील, संध्या नरे-पवार, संपत देसाई, कृष्णात खोत, प्रविण बांदेकर