व्हाँईस ऑफ मिडिया अवाँर्ड 2023 राज्य उत्कृष्ट तालुकाध्यक्ष पुरस्काराने समाधान केवटे सन्मानित

94

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.28फेब्रुवारी):-महाराष्ट्र शासन व्हॉईस ऑफ मीडिया व शेठ ब्रिजमोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने आयोजित व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र भूषण २०२३ व व्हाँईस ऑफ मीडिया जर्नलिझम अवाँर्ड २०२३ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात आले होते.

यामध्ये विदर्भ विभागातून उत्कृष्ट तालुकाअध्यक्ष म्हणून व्हाँईस ऑफ मीडिया पुसदचे अध्यक्ष समाधान केवटे यांचा २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे सन्मानपत्र व शाल देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सदर पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आ. रोहित पवार, युवासेना अध्यक्ष आ. आदित्य ठाकरे, अमरावतीच्या आमदार यशोमती ठाकूर, आ. राहुल पाटील तसेच व्हाँईस ऑफ मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे. प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के. उपस्थित होते.

यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया यवतमाळ जिल्हा आरोग्य समन्वयक पदी समाधान केवटे यांची नियुक्ती भिमेश मुतूला. राष्ट्रीय अध्यक्ष आरोग्य सेल व तुषार रसाळ कार्याध्यक्ष आरोग्य सेल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.

या सत्कार सोहळ्याला व्हाँईस ऑफ मीडिया संघटना पुसदचे कोषाध्यक्ष प्राध्यापक एस. एल. राठोड, प्रसिद्धी प्रमुख अरुण बरडे, संघटक रवी खरात, यांच्यासह महाराष्ट्रातील व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.