बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचितची विजयी घौडदौड….!!!

334

महाराष्ट्राच्या राजकारणात आंबेडकरी समाजाचा रिपब्लिकन पक्ष अदखलपात्र ठरला. त्याची जागा खऱ्या अर्थानं आता बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने घेतली. 2014 च्या विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघांमध्ये त्यांनी आपली मतदार संख्या नोंद केली आहे. आंबेडकरी विचारधारा मानणारा प्रत्येक माणूस आज आपले जात विसरून बहुजन किंवा वंचित म्हणून आपली ओळख निर्माण करीत आहे. अनेक पक्षात असणारे कार्यकर्ते त्यांना आज समाजामध्ये जातीचा उमेदवार म्हणून एक वेगळी स्वाभिमानी ओळख वंचित बहुजन आघाडीमुळे निर्माण झाली असे चित्र आज महाराष्ट्र राज्यात सर्वत्र दिसत आहे. त्याची प्रचिती विधानपरिषदेच्या १२ आमदारांची नावे जाहीर झाली तेव्हा दिसून आली होती.त्यामुळे त्यांची दखल अनेक राजकीय पक्ष घेताना दिसत आहेत.

सत्ताधारी महाविकास आघाडीत तीन पक्ष होते. कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्यांनी आपापल्या पसंतीची शिफारस करुन यादी राज्यपाल महोदयांकडे पाठविली आणि राज्यपाल महोदयांनी त्या यादीला मंजुरी दिली असा त्याचा संदर्भ सांगितला जातो किंवा तसा लोकशाही प्रघात आहे अशीही बाजू मांडली जात होती. राज्यपालांनी त्यांच्या या भूमिकेला सुरुंग लावला होता प्रत्यक्ष चित्र वेगळं होतं विधान परिषदेच्या 12 आमदारांमध्ये ३ आमदार हे वंचित बहूजन आघाडीचे विधानसभा उमेदवार म्हणून लढणारे पराजित आमदार होते त्यांची ओळख हे वंचित चे उमेदवार आणि वंचित चे चेहरे म्हणूनच इतर पक्षाने त्यांना स्वीकारलं हे नाकारता येत नाही. हेच वास्तव आणि सत्य आहे…!!

आंबेडकरी विचार मानणाऱ्या समाजामध्ये अनिरुद्ध वनकर,आनंद शिंदे आणि यशपाल भिंगे हे सूप्रसिद्ध झालेले आहेत. तेच विधानसभेचे वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार होते नव्हे ते वंचितांचा चेहरा म्हणून विधानसभेत समाजाचे प्रतिनिधी म्हणून वंचित बहूजन आघाडीने महाराष्ट्राला त्यांची ओळख करुन दिली होती.कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना जी आमदारकी बहाल केली ती त्यांच्या कामगिरी वरुन पक्षनिष्ठेवरुन किंवा कार्य कर्तृत्वावरुन दिली नव्हती,तर वंचित समाजात वंचित बहुजन आघाडीचे वाढत चाललेलं वर्चस्व लक्षात घेऊन त्यांना ही उमेदवारी देण्यात आली होती. वंचित समुहाला दाखवण्यासाठी किंवा आकर्षित करण्यासाठी त्यांनाही उमेदवारी देण्यात आली होती हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे. म्हणूनच वंचित समाजामध्ये आपण सत्ताधारी होऊ शकतो ही इच्छाशक्ती निर्माण झाली आहे.

बाळासाहेब आंबेडकर यांनी पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिका महानगरपालिका यामध्ये वंचित समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना उमेदवारी देऊन सत्तेत सहभागी करून घेतले आहे हे आता सर्व वंचित समाजाच्या लोकांनी प्रत्यक्ष पाहिले आहे.आणि म्हणूनच येणाऱ्या विधानसभा निवडणूक मध्ये वंचित बहुजन आघाडी ही निर्णायक ठरणार आहे. तिची विजयी घौडदौड कोणी रोखू शकणार नाही.वंचितांना सत्ता मिळालीच पाहिजे ही इच्छाशक्ती बहुजनामध्ये निर्माण झाली आहे. एडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे विजयी घौडदौड कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला वंचितांच्या सत्तेचा हक्क मान्य केल्या शिवाय पर्याय नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तास्थानी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तर मराठा समाजाच्या घराणशाहीचे वतनदार धन दांडगे आहेत. त्यांनी आजपर्यंत वंचित समाजाला तुकडे टाकून झुलवत ठेवले आहे. त्यांनी बहूजन वंचित समाजाला सत्तेत सहभाग कधीच दिला नाही. साधे ग्रामपंचायत चे सरपंच पद मिळाल्यावर मागासवर्गीय कुरची वर बसलेला त्यांना सहन होत नाही.मग पंचायत, जिल्हा,परिषद,आमदार आणि खासदार दूरच आहेत. त्या पदाला बहुजन वंचित समाजाला लायक वंचित बहुजन आघाडीने बनविले.

महाराष्ट्रातील बहुजन समाजामध्ये होऊ शकत नाही. अशी मानसिकता तयार करून ठेवली असल्यामुळे होणार नाही. ही मानसिकता बहुजन समाजामध्ये होती.ती बदलण्याचे महान कार्य मान्यवर कांशीरामजी यांनी “जिसकी की संख्या भारी,उतनी उसकी भागीदारी” ही भूमिका घेऊन उत्तर भारतात प्रबोधन करून चार वेळा सत्ता परिवर्तन करून दाखवले केले. स्वबळावर चार वेळा देशातील सर्वात मोठ्या राज्याची सत्ता हातात घेतली आणि होऊ शकते हे करून दाखवले.

महाराष्ट्रातील आंबेडकरी विचारांच्या नेत्या सह बहुजन समाजाची मानसिकता बदल्याचे काम बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित च्या माध्यमातून 2019 च्या लोकसभा,विधानसभा निवडणुकीत मतदान घेऊन दाखवले.गेल्या एक दोन वर्षातील झंजावती जाहीर सभेने राज्यातील बहुजन समाजातील वंचित लोकांच्या मनात आदरांचे स्थान निर्माण करण्यात ते आज तरी यशस्वी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यांची दखल सर्वच राजकीय पक्षांना घेण्यास भाग पडत आहे. आंबेडकरी विचाराचा रिपब्लिक पक्ष कुठे ही दखल पात्र नसतात. बाळासाहेब आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष गेल्या निवडणुकीतील मिळविलेल्या मतदार संख्या व टक्केवारी मुळेच दखल पात्र ठरत आहे.
प्रकाश आंबेडकर यांची ही तुकड्यांची थीटी सत्ता आम्हाला नको!. आम्हाला संपूर्ण सत्ता हवी आहे,हा निग्रह आता वंचित बहूजन समाजाने केला आहे असे वातावरण आज तरी दिसत आहे.

त्यामुळेच विधानपरिषद मध्ये जाणारे धन दांडगे, जात दांडगे राजकीय वतनदार त्या भितीपोटी १२ पैकी ३ आमदार सरळ सरळ वंचित बहूजन आघाडीला महाविकास आघाडीने दिले होते.हेच वातावरण कायम राहिले तर वंचित बहुजन आघाडीला सत्ताधारी बनता आले नाही तरी मजबूत विरोधी पक्ष म्हणून कोणत्या सत्ताधारी पक्षाला दखल घ्यावी लागेल. बहुजन समाजाने आपला वैचारिक शत्रू कोण हे त्याला मदत करणारा आपल्या समाजाचा कार्यकर्ता,नेता शत्रु गोटाला जाऊन मिळालेला समाजाचा नेता होऊ शकत नाही. ही ठाम भुमिका वंचित समाजाच्या घराघरात झाले पाहिजे. प्रबोधनतून परिवर्तन झाल्या शिवाय राहणार नाही. म्हणून कार्यकर्त्याने आपल्या नगरात नगरात शत्रू गटात किर्याशील असणाऱ्या आपल्या माणसाचे नेटाने प्रबोधन करा.अन्यता त्याची जागा त्याला दाखवा.

आंबेडकरी चळवळीतील एका नेत्याचे म्हणणे होते की इतर पक्षाशी युती आघाडी करा.”गाजरची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली” रिपब्लिकन पक्षाच्या अनेक गटानी हीच भूमिका स्वीकारून स्वताचे अस्तित्व गमावून बसले. भिकाऱ्या सारखी सत्ता रिपब्लिकन पक्षाने ९० च्या दशका पासुन घेतल्याचा अनुभव घेतला आहे. पूर्वीचे पंथर रामदास आठवले, दयानंद म्हस्के,प्रितमकुमार शेगांवकर आणि गंगाधर गाडे हे मंत्री झाले तर अनिल गोंडाने हे विधानपरिषदेचे आमदार झाले होते. एक खासदार मागच्या दाराने दुसऱ्या फळीतील नेत्यांना बाजूला सारून विधानपरिषद मध्ये सोळा वर्ष ज्यांना शिव्या देऊन मोठे झाले त्यांच्या आशीर्वादाने विधानपरिषद मध्ये गेले.आज त्यांची परिस्थिति घरका ना घाटका झाली आहे.बहुजन समाजातील एका नेत्याला तुकड्यांची सत्ता देऊन. समाजाचा आर्थिक सामाजिक विकास खुंटून ठेवला आहे.एकट्या व्यक्तीचा आर्थिक विकास झाला.एका व्यक्तीला मान सन्मान मिळाला.परंतु बाकी बहुजन वंचितांचे काय?

वंचितांच्या सत्तेचा हक्क विरोधकही मान्य करायला लागले आहेत याचा अर्थ आता आपणांस सत्तेपासून कुणीही रोखू शकत नाही मात्र सत्तेसाठी लागणारी वैचारिक आणि सामाजिक जबाबदारी स्विकारुन कार्य कर्त्यांनी इमानदारीने प्रामाणिकपणे समर्पित भावनेने कामाला लागले पाहिजे. पक्षासाठी बूथ,सेक्टर वॉर्ड, बांधणी आवश्यक असते.तेव्हाच विजय खेचून आणता येतो. म्हणूनच म्हणतात सत्ता हवेतून मिळतं नाही. त्यासाठी योजना बद्ध, नियोजन बद्ध रचना आखणी असावी लागते.भाषणाने प्रबोधन होऊ शकते.त्यातून मत परिवर्तन घडविले जाईल. पण त्या मतदाराला मतदान केंद्रा पर्यन्त सुरक्षित नेण्याची जबाबदारी ही कार्यकर्त्यांची वैचारिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक दुष्टिने मशागत करावी लागते,हे लक्षात घेऊन बहुजन वंचित समाजाच्या कार्यकर्त्यांनी समाजात काम केले पाहिजे.

मी मोठा,तू मोठा हे हेवे दावे विसरून समाजात काम केल्यास गवातून खडे बाहेर फेकून देऊन दिल्यास आरोग्यासाठी चांगले पीठ मिळते.तसेच सत्तेसाठी चांगली वातावरण निर्मिती होऊ शकते.बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचितची विजयी घौडदौड चांगली सुरू आहे. ती रोखण्यास समाजातील कुराडीचे दांडे ही कामास लावले जातील.हे लक्षात घेऊन जागरूक होऊन राजकारण करणे आवश्यक आहे.समाजातील साहित्यिक विचारवंत लेखक बुद्धिवान आहेत परंतु त्यांच्याजवळ निष्ठा नाही,असे लोक समाजाला विकण्याचे काम करतात.

राजकीय व सामाजिक आंदोलनासाठी निष्ठेची खूप गरज असते.निष्ठेशिवाय कोणतेही आंदोलन चालविणे किंवा ते यशस्वी करणे शक्य नाही. जर तुम्ही आंदोलन उभे करायचे ठरविले असेल तर निष्ठेची खूप गरज आहे.”निष्ठेचा काय अर्थ आहे” जे स्वप्न घेऊन तुम्ही पुढे चालत आहात त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी जे काम तुम्ही सुरु करता त्या कामाला आचार विचार करून स्वीकार केले पाहिजे. आणि जर विचार करून स्वीकार केला असेल तर जिंदगीभर ते पूर्ण करण्यासाठी ते निभवाल तर तुम्ही निष्ठावान आहेत आणि आणि या कामाला पूर्ण करण्यासाठी तुम्ही जीवनभर कष्ट केले असे म्हणता येते.

वामनदादा कर्डक यांना चित्रपटातील लोकांनी गाणी लिहिण्यासाठी कित्येक वेळेस लाखो रुपयांची ऑफर दिली गेली पण वामनदादा ने चित्रपटासाठी गाणे लिहिलेले नाही.तर जिंदगीभर त्यानी स्वतःसाठी जे काम स्वीकारले होते ते काम त्यांनी शेवटपर्यंत केले.आज लोक त्यांना लोकशाहीर,लोककवी म्हणतात.लोकांच्या मनात त्यांच्याविषयी श्रद्धा व सन्मान आहे.आंदोलन चालवण्यासाठी निष्ठेची आवश्यकता असते.परंतु आंदोलन फक्त निष्ठेच्या विश्वासावर चालत नाही. बुद्धीची पण गरज असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला निष्ठावान लोक पाहिजेत,बुद्धीची भरपाई मी करेन.बुद्धीला बाबासाहेबांनी दुसऱ्या स्थानावर ठेवले.निष्ठा नाही आणि केवळ बुद्धी आहे तर खूप भयावह आहे.कारण जे बुद्धिवान आहेत त्यांच्याजवळ निष्ठा नाही,असे लोक समाजाला विकण्याचे काम करतील.बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचितची विजयी घौडदौड रोखण्यासाठी बुद्धीभेद कारणासाठी मान्यता प्राप्त प्रिंट मीडिया,चॅनल मीडिया,सोशल मीडियावर किर्याशील होतील त्यापासून बहुजन वंचित समाजाने सावध राहावे.बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचितची विजयी घौडदौड वाढवावी.

✒️सागर रामभाऊ तायडे(9920403859)भांडुप,मुंबई