नवोदय निवड चाचणी निकालात कर्मवीर विद्यालय नागभीड चे सुयश

114

 

संजय बागडे 9689865954
नागभीड तालुका प्रतिनिधी

नागभीड- : नुकत्याच जाहीर झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश निवड चाचणी 2024 च्या निकालात कर्मवीर विद्यालय नागभीड चा विद्यार्थी निमिश मिलिंद प्रज्ञावर्धन याची शहरी विभागातून नवोदय विद्यालय तळोधी‌( बाळापूर) साठी निवड रफईझालेली आहे.
नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षणाचे दालन उपलब्ध व्हावे , परीक्षे द्वारा प्रज्ञावंत विद्यार्थी शोधून अशा विद्यार्थ्यांनी स्वतःचा, समाजाचा अर्थात राष्ट्राचा सर्वांगीण विकास साधावा या दृष्टिकोनातून भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाच्या वतीने नवोदय विद्यालय निवड चाचणी परिक्षेचे आयोजन केले जाते. या वर्षी घेण्यात आलेल्या नवोदय निवड चाचणी परिक्षेत कर्मवीर विद्यालय नागभिडच्या निमिश मिलिंद प्रज्ञावर्धन या विद्यार्थ्याची निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्य जीवनातील स्पर्धा परीक्षांचे महत्व लक्षात घेऊन त्यांच्या शालेय स्तरावरील विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी विद्यालयात NMMS, शिष्यवृत्ती,नवोदय, NTS या सारख्या परीक्षांचे जादा वर्ग व सराव परीक्षा शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापासून घेतले जातात. विद्यालयातील शिक्षकवर्ग अशा बाबींचे सुत्रबद्ध नियोजन करून कठोर परिश्रम घेत असतात. विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या अथक प्रयत्नांचे फलित म्हणजे या वर्षी विविध परीक्षेत विद्यालयाने घेतलेली उत्तुंग झेप. त्याचेच उदाहरण म्हणजे कु. निमिश प्रज्ञावर्धन या विद्यार्थ्याची नवोदय विद्यालयासाठी झालेली निवड आणि विविध परीक्षांमध्ये गुणवंत ठरलेले विद्यालयाचे अनेकविध विद्यार्थ्यी.
कु. निमिश च्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष राजाभाऊ देशपांडे, संस्थेचे सचिव रविंद्रजी जनवार, संचालिका सौ.वर्षाताई जनवार, प्राचार्य देविदास चिलबुले,पर्यवेक्षक युवराज इडपाचे,
सर्व प्राध्यापक तथा शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग यांनी त्याचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले असून समाजाच्या विविध स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.