हरिनाम भागवत सप्ताहात हनुमान जयंती उत्सव साजरा

  113

   

  रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
  ब्रम्हापुरी :-
  तालुक्यातील अर्हेर नवरगाव येथील हनुमान मंदीर देवस्थान येथे श्रीमद देवी भागवत,रहस्य ग्रामगीता तत्वज्ञान,रहस्य हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या शेकळो वर्षांपासून हनुमान मंदिर कमिटी तर्फे येणाऱ्या पिढीला भक्तीची नाळ जुळून राहावी व त्यांच्या हातून सत्कर्म घळावे, खेळ्यापाड्यात ग्रामगीतेचा प्रसार व प्रचार व्हावा, हनुमान जयंतीच्या निमित्याने महाबली हनुमान यांच्या भक्तीचे पडसाद येणाऱ्या पिढीवर उमटावे या करिता श्रीमद देवी भागवत रहस्य ग्रामगीता तत्वज्ञान रहस्य हरिनाम सप्ताह व हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
  रामजन्मोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पासून पुढे सात दिवस भागवत सप्ताह साजरा करण्यात येते. यात महाबली हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते.
  या प्रसंगी सु. श्री. साध्वी दिलाशा मेगशाम ठलाल यांनी दि.19 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान आपल्या अमृत्यूल्य वाणीतून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाळगेबाबा यांचे कृतिशील विचार, भारत मातेला वंदन,प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, महाबली हनुमान यांचे जीवनचरित्र आपल्या भागवत प्रवचनाच्या माध्यमातून उदाहरणांसह सांगितले तर दैनंदिन कार्यक्रमात हरिपाठ, सामुदायिक प्रार्थना,भगवत गीता प्रवचन, महाबली हनुमान प्रवचन, व्यसनमुक्ती मार्गदर्शन व भजन कीर्तनाच्या गजरात रामधूम ,झाकी प्रदर्शन करण्यात येत असते संपूर्ण कार्यक्रमाला गावकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत मोठी गर्दी असते.हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच समारोपीय दिवशी गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी रामारोपीय कार्यक्रम,गोपालकाला व महाप्रसादाचा आस्वाद घेण्याचे आव्हाहन हनुमान देवस्थान कमिटीचे वतीने करण्यात आले आहे.
  सदर भागवत सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाला व गोपालकाल्याला पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार,ऍड.हेमंत उरकुडे, ऍड.आशिष गोंडाने, माजी. जि. प. उपाध्यक्ष कृष्णा सहारे, माजी. जि. प.सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी पं.स. सदस्य विलास उरकुडे, उमेश धोटे सरपंच चौगाण, धनराज मुंगले, संजय बगमारे, गोवर्धन दोनाडकर पत्रकार दै. देशोन्नती, प्रा.प्रशांत राऊत पत्रकार दै. नवराष्ट्र, अमरदीप लोखंडे पत्रकार दै. लोकमत, ग्रा.पं.सरपंच सौ दामिनी चौधरी, सुरेश आडकीने, ग्रा.पं. सदस्य श्रीकांत पिलारे,वामनराव मिसार,अकुल राऊत पो.पा.,नानाजी बगमारे व गावकरी मंडळी उपस्थित राहणार आहेत.