जागतिक पुस्तकदिन निमित्त जयसिंग वाघ यांचा सन्मान

65

जळगाव :- जळगाव जिल्हा शासकीय अभियंता पतसंस्था तर्फे जागतिक पुस्तकदिन निमित्त अभियंता भवन , जळगाव येथे २३ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात ‘ पुस्तकांची आजी ‘ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भीमाबाई जोंधळे ( नाशिक ) यांच्या हस्ते मदर टेरेसा हे पुस्तक देवून सन्मानित करण्यात आले .
जयसिंग वाघ यांनी भीमाबाई जोंधळे यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांच्या वाचन चळवळ विषयी माहिती जाणून घेतली असता त्यांनी सध्या माझ्या हॉटेल मध्ये ऐकून आठ हजार पुस्तकं असून पाचशे दैनिके वाटप करते . पुस्तकांची शिदोरी हा उपक्रम सुद्धा मी राबवत असून लवकरच दवाखान्यात सुध्दा पुस्तकं ढेवण्यात येतील . मोबाईल जगतात वाचन संस्कृती वाढत आहे हे या वाचन चळवळीचे यश आहे .
जयसिंग वाघ यांनी वाचन संस्कृतीतून सुसंस्कृत पिढी घडते , हल्ली अनेक साहित्यिक काल्पनिक , मनोरंजक , अवास्तववादी लिखाण करीत आहेत यातून समाजात अशांतता निर्माण होते व संकुचित विचारांची पिढी तयार होते या पार्श्भूमीवर आपण करीत असलेले कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे .
या प्रसंगी ब्रम्हानंद तायडे , साहेबराव पाटील , प्रवीण जोंधळे , डॉ. रंजना चव्हाण , सोसायटी चे चेअरमन विश्वास तायडे तसेच काही मान्यवर मंचावर हजर होते .