मालवाहू गाड्यामुळे बाजार लाईनीत रहदारीस अडथळा – नगरपरिषदेचे दुर्लक्ष. व्यापाऱ्यांची मनमानी

101

 

चिमूर –

चिमूर शहरातील टिळक वॉर्ड येथील मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या मनमानी पद्धतीने कोणत्याही वेळेला मालवाहू वाहने लागत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून दूचाकी वाहने व बाजारपेठेत वस्तू खरेदी करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नगर परिषद मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.
सर्वात जुनी आणि महत्वाची बाजारपेठ असलेल्या रोडवर भरपूर प्रमाणात अतिक्रमण वाढले असून जुनी वस्ती असल्याने एकाही प्रतिष्ठान समोर पार्किंगची व्यवस्था नाही. अश्यातच रोड अरुंद असल्याने मोठे वाहन निघण्यास अडचण निर्माण होत असून मोठे मोठे व्यापारी आप आपल्या प्रतिष्ठान समोर मालवाहू वाहने तासोनतास उभे करताना दिसून येते. कधी कधी तर दोन्ही मोठे वाहने सारखेच लाऊन ठेवताना आढलले असून जाण्याचा पूर्ण मार्ग बंद केल्याचा प्रकार सुधा घडला आहे. ग्राम पंचायत कार्यकालात माल वाहक वाहनांना प्रवेश बंदी केली होती. पण नगर परिषद कार्यकालात मात्र नगर परिषद प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे.