सिंदेवाहीत बँकेला सकाळीच मोठी आग अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण

  521

   

  रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 8888628986
  सिंदेवाही:-
  चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. चंद्रपूर सिंदेवाही शाखेला सकाळी जवळपास 8 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु झाले. आग मोठी आहे. त्यामुळे धाकधूक वाढली. बँकेलगत असलेल्या मकानाना आगीचा घेराव घेण्यात वेळ लागत नव्हता त्यामुळे सर्वांची भितिजनक धास्ती वाढली होती. बघ्यांची गर्दी उसळली होती.
  अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केला आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास त्यांना यश मिळाले.
  आगीच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही आग नेमकी का लागली? या मागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आगीत नेमकं कितपत नुकसान झालंय? याबाबतची देखील माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण आगीचे व्हायरल झालेले व्हिडीओ हे धडकी भरवणारे आहेत.