✒️सातारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)
सातारा(दि.5ऑगस्ट):- दलित पॅथरच्या महाराष्ट्र राज्याची कार्यकारणी दलित पॅथरच्या राष्ट्रीय अध्यक्षा मलिका ढसाळ यांनी जाहिर केली. या नवनिर्वाचीत कार्यकारणीत डाॅ.घनःशाम भोसले यांची महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली आहे.
डाॅ.घनःशाम भोसले यांचे कार्य गावातील ग्रामपंचायत ते मंत्रालय या क्षेत्रातील कोणताही प्रश्न असो तो सोडविण्यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न असतात.
अनेक प्रश्न सोडविण्यात राष्ट्रीय अध्यक्षा – मलिका ढसाळ, राष्ट्रीय उपाध्यक्ष – बाळासाहेब पडवळ, राष्ट्रीय कार्याध्यक्ष – यशवंत नडगम यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे.
पद असो अथवा नसो प्रश्न कोणताही असो तो मार्गी लावण्यासाठी डाॅ. घनःशाम भोसले कशा पध्दतीने काम करतात हे मुंबई – पुणे – बारामती च्या जनतेसह महाराष्ट्रातील जनतेने देखील बघीतले आहे. याच कामाची दखल घेवुन पक्षश्रेष्ठींनी डाॅ. घनःशाम भोसले यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली तर प्रदेश उपाध्यक्ष पदी संजय लुटे आणि संतोष गायकवाड तसेच प्रदेश कार्याध्यक्ष अविष राऊत, प्रदेश सरचटणीस – अरविंद मोरे, प्रदेश चिटणीस – सतिश वाघेला, प्रदेश कोषाध्यक्ष – रविंद्र जाधव,प्रदेश संघटक – चंद्रशेखर ढसाळ, सुरेश नेटावते, शशिकांत कांबळे, जनसंपर्क प्रमुख – जनार्दन घायमुक्ते,प्रदेश कार्यकारिणी सदस्य – आयुब शेख, संजय भालेराव,गणेश म्हेत्रे, कायदेशीर सल्लागार – अॅड चक्र नारायण, महाराष्ट्र कमिटी संघटक – मा. अमोल जगताप, सदस्य – मधुसधन रामास्वामी , अॅड मनोज जावळे याची निवड करण्यात आली आहेत. दलित पॅथर अन्याय अत्याचारा विरोधात झेप घेऊन अत्याचार पिडितांना न्याय देईल. अशी माहिती दलित पॅथरच्या राष्ट्रीय अध्यक्षा मलिका ढसाळ यांनी दिली.
*पदाधिकारी यांना मलिका ढसाळ यांनी पुढील सुचना केल्या आहेत*
पदनियुक्ती चा अधिकार फक्त प्रदेश अध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष तसेच प्रदेश कार्याध्यक्ष यां तिघांनाच देण्यात आला आहे. पत्रकारावरील पॅथर सिम्बोल एकच असला पाहिजे. मुबंई – पुणे – पालघर – नाशिक औरंगाबाद प्रत्येक पदाधिकारी यानी संघटनेतील पदाधिकार्याशी फोन वरून एकमेकांशी संपर्क साधने बंधनकारक आहे .
जिल्हा, तालुका स्तरीय कमिटी निवडण्याचा अधिकार फक्त महाराष्ट्र कमिटी कार्यकारिणीलाच असेल तसेच एका व्यक्तीला एका पेक्षा जास्त पद मिळण्यासाठी बहुमताने विचार करण्यात येईल.या तीन कमिटीवर निरक्षण समिती असेल त्याचा निर्णय मान्य करावाच लागेल.
पद निरिक्षक पदी राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब पडवळ तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम यांची निवड करण्यात आल्याची माहिती मलिका ढसाळ यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे दिली तसेच त्यांनी सर्व पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.