चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना आजारामुळे एकाचा मृत्यू – आज (दि.23ऑगस्ट) रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 94 नवीन कोरोना बाधीत

88

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.23ऑगस्ट):-कोरोना आजार दिवसेंदिवस जिल्ह्यात कहर करीत असून दि.22 ऑगस्टचा सायंकाळी चंद्रपूर येथील बाजार वार्डातील 55 वर्षीय पुरुषांचा मृत्यू झाला.मृतकाचे स्वब अहवाल 19 ऑगस्ट रोजी कोरोना पोसिटीव्ह आला होता. त्याचा नागपूर येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.

  चंद्रपूर जिल्ह्यात आता पर्यंत 15 मृत्यू झाले असून यात  तेलंगणा एक व बुलढाणा जिल्ह्यातील एक मृत्यू आहे. जिल्ह्यात आज 24 तासात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 94 नवीन कोरोना बाधीत आढळून आले.