✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.26ऑगस्ट):-येथील महाओष्णीक विद्युत केंद्राच्या वसाहतीत आज सायंकाळी 6.45 वाजताच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात लावण्या उमाशंकर धांडेकर (५) या मुलीचा मृत्यू झाला.उमाशंकर धांडेकर हे वीज केंद्रातील औद्योगिक सुरक्षा दलात कार्यरत आहे. सायंकाळी त्यांची मुलगी लावण्या खेळत असताना तिथे बिबट आला व हल्ला केला. यात लावण्या जखमी झाली.तिला शासकीय वेधकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात आणले असता मृत घोषित करण्यात आहे.वीज केंद्र वसाहतीत बिबट आल्याने दहशत व भीतीचे वातावरण आहे.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED