तेव्हाही पचत नव्हता
आणि आजही पचत नाही
तेव्हाचा तुकाराम
वैकुंठाला पाठवायचा
आणि आजचा तुकाराम
बदली करून नाचवायचा
त्यावेळी परशुराम चालायचा
आता आसाराम चालतो
कुणीतरी हल्ली आता
मिशिवाल्या रामाची चर्चा करतो
पण समाजासाठी
तळमळीने काम करणारा
तुकाराम चालत नाही
तेंव्हाही फार फार छळलं तुकारामाला
त्याची गाथा बुडवून,
आताही फार छळतात तुकारामाला
त्याची बदली करून
पण एवढं मात्र लक्षात ठेवा
तुकाराम संपत नसतो
तुकाराम थांबत नसतो
तो पिढ्यांन पिढ्या
अभंग होऊन जिवंत राहत असतो…
✒️शब्दांकन:-दंगलकार नितीन चंदनशिवे.
मु.पो.कवठेमहांकाळ
जि.सांगली.
मो:-7020909521.(व्हाट्स अप)
▪️ संकलन-नवनाथ पौळ
(केज तालुका प्रतिनिधी)
मो:-8080942185