शिक्षक म्हणुन होणार खरा सन्मान

31

माझ्या हातात आज जेव्हा माझ्या विद्यार्थिनीने diary दिली आणि म्हणाली सर ही माझी छोटीशी भेट.
ती सातवी पास होऊन शाळेतून पुढील वर्गाकरिता tc घेऊन गेली.वर्ग 5 ते 7वी मी तिचा वर्गशिक्षक होतो .माझ्याबद्दल असणारा जिव्हाळा तिने ह्या diary नोंदविला
आज मला किती सधन शिक्षक आहे याची प्रचिती माझ्या इवल्याश्या बाळाने करून दिली ,आपण जे प्रेम ज्ञान, त्यांच्यासोबत घालविले शाळेतील गोड ,प्रसंगी शिस्त या साऱ्या आठवणीने मन भरून निघाले.

तिच्या या डायरीने माझ्यातील सामर्थ्याची आणि क्षमतेची जाणीव करून दिली. कदाचित यापेक्षा मोठा पुरस्कार दुसरा कोणताच नसेल.आपण बघतो,की ओळख आणि स्वतः च्या अधिकाराचा वापर करून कित्येक लोक आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविण्याच्या धडपडीत असतात आणि मिळवितात कदाचित या चिमूकल्यांच्या व गावकऱ्यांनी दिलेल्या प्रेमाच्या समोर हा पुरस्कार तुच्छ आणि कमी आनंद देणारा असेल असे मला वाटते. असल्या पुरस्काराच्या हव्यासापेक्षा मुलांच्या हृदयातील आदर्श शिक्षक बनायला मला केव्हाही आवडेल.
आज मला खरच सुखद आनंद या मुलीने दिला. आज माझ्या आनंदाला पारावर उरले नाही.

नवी प्रयोग ,नवनवीन ज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या मनात घर बनविण्यासाठी जणू ही प्रेरक ऊर्जाच या चिमुरडीने मला दिली.मला असेच मुलांच्या हृदयात राहायला आवडेल..कोरोना च्या अतिशय तणावाच्या काळातही माझे सर आणि शाळा आठवते म्हणून हिरमुसणारी लता मला आपल्या कृतज्ञ भावनेने खूप आनंद देऊन गेली.माझ्यातील सामर्थ्यस्थळांची जणू तिने पावतीच दिली. निरागस मुले कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय खरी मूल्यमापन करतात.एका शिक्षकांची गुणवत्ता आणि त्याचे आदर्शत्व मुलांपेक्षा इतर कोणीही अचूक ठरवू शकत नाही!

✒️लेखक:-राजेंद्र बन्सोड
स.शि. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा
पंचायत समिती गोरेगाव,जि.प.गोंदिया
मो:-8275290252