आंबेडकर नगर (भामरागड) येथिल नाली बांधकाम अपूर्ण

31

🔺नागरिकांचे आरोग्य धोक्यात

✒️संतोष संगीडवार(आलापल्ली प्रतिनिधी)मो:-7972265275

आलापल्ली(दि.5सप्टेंबर):-गडचिरोली जिल्हातील दुर्गम अशा भामरागड तालुक्यातील आंबेडकर नगर, वॉर्ड क्र. 5 मध्ये काही वर्षा अगोदर नाली बांधकाम करण्यात आली. परंतु ती नाली अर्धवट असल्यामुळे त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना बाराही महिन्यात सांडपाण्याचा, दुर्गंधी चा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रोगराई हि पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे येथील नाली बांधकाम पूर्ण करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुका हा पूर्णतः नक्षलवादी क्षेत्र मानला जातो, त्यातच इथे सोयी सुविधांचा अभाव दिसतो. भामरागड येथील नगरपंचायत चा दुर्लक्ष पणामुळे आंबेडकर नगर, वॉर्ड क्र. 5 येथील नाली अर्धवट बांधली गेली असल्यामुळे याचा परिसरातील राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. सद्या जग कोरोनामुळे त्रस्त आहे, यात या नालीमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी, तसेच रोगराई चे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येतात. अशा वेळेस शासनाचा ग्राम/नगरी स्वछ अभियान गेलं कुठं असा प्रश्न निर्माण होत आहे. बऱ्याच वेळा या बाबत तक्रार देऊनही नगरपंचायत भामरागड पाहणी/पडताडणी का बरं करत नाही? कदाचित याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे संभ्रम निर्माण होत आहे. त्वरित या कडे लक्ष देऊन अर्धवट असलेल्या त्या नालीचे बांधकाम पूर्ण करण्याची व येथील समस्या दूर करण्याची मागणी स्थानिक नागरीक करीत आहेत.