नाखलगाव ते आलापुर रस्त्यासाठी माकपचे निदर्शने

33

✒️ समाधान गायकवाड(माजलगाव प्रतिनिधी):-8552862697

माजलगांव(दि.5सप्टेंबर):- पुरोगामी विचाराच्या पत्रकार गौरी लंकेश यांचा हुतात्मा दिन यांच्या8552862697 हुतात्मा दिनी शेतकरी शेतमजूर युवक विद्यार्थी श्रमिक यांच्या प्रश्नांना घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये आंदोलनाची हाक देण्यात आली होती. याचाच भाग म्हणून माजलगाव उपविभागीय कार्यालयावर निदर्शने करून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. १.त्यामध्ये कोरोना चे संकट असेपर्यंत प्रत्येकाला दर महा पंधरा किलो धान्य, एक किलो दाळ, एक किलो खाद्य तेल, एक किलो साखर देण्यात यावी.

२.शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्जाचे वाटप करण्यात यावे. ३.नवीन शैक्षणिक धोरणात प्रमुख बदल झाले पाहिजे. यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने नाखलगाव ते आलापुर रस्ता झाला पाहिजे अशी मागणी केली आहे. गेली पंधरा ते वीस वर्षांपूर्वी झालेला हा रस्ता त्यावर नंतरच्या काळात कुठलीही साधी डागडुजी सुद्धा झालेली नाही. प्रत्येक वेळेस निवडणुकीच्या काळात आश्वासने दिली जातात. माजी आमदार आर टी देशमुख यांनी ही आश्वासन देऊन शब्द पाळला नाही. व सध्याचे आमदारांनी देखील शब्द दिलेला आहे परंतु त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. नाकलगाव ते आलापुर हा रस्ता माजलगाव तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर सातत्याने मोठ्या प्रमाणात रहदारी असते. या रस्त्यावरून जाता येता प्रवाशांना खूप मोठी कसरत करावी लागत आहे दोन चाकी वाहने कशीबशी जातात परंतु चार चाकी वाव्हान नेहणे मुश्कील आहे.

म्हणून हा रस्ता तात्काळ होणे गरजेचे आहे हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा यासाठी माजलगाव उपविभागीय कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. व रस्ता लवकरात लवकर नाही झाला तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी आंदोलनात कॉ.मुसद्दिक बाबासर,कॉ.सय्यद याकुब कॉ. मोहन जाधव,कॉ. सुहास झोडगे, कॉ.रोहिदास जाधव,कॉ.विनायक चव्हाण,कॉ.भगवान पवार, कॉ.अशोक राठोड,कॉ.बाबा, कॉ.मेहबूब, दत्ता पवार,नितीन झोडगे,अजय दांगट,रणजित पवार,सत्तू आतकरे,हनुमान गवळी,सय्यद फारुख,शेख समीर जाधव गजानन,यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.