🔸मागण्या मान्य करा अन्यथा रस्त्यावर उतरू- बीड जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ डोंगरे

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)
मो:-8080942185

केज(दि.8सप्टेंबर):-दि.7 सप्टेंबर 2020 पासून अंबाजोगाई नगर परिषद अंतर्गत कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद करत ते सुरळीतपणे चालू करण्यासह विविध मागण्यांसह बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत.या सफाई कामगारांना साथ देत वंचित बहुजन आघाडीतर्फे बीड जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांच्यामार्फत मुख्याधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले असून सदरील सफाई कामगारांच्या वेतन , निवाह भत्ता , विमा , covid 19 काळातील मानधन , संपावर गेल्यापासून रुजू होईपर्यंत चे वेतन , कामगारांच्या महिन्याच्या पगारी शासकीय बॅंकेतून करण्यात याव्यात , या सर्व मागण्या मान्य करण्यात येऊन जनतेला दिवस रात्र सेवा देणाऱ्या covid 19 योध्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

याप्रसंगी निवेदन सादर करताना बीड जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे , अंबाजोगाई तालुकाध्यक्ष जांबुवंत उर्फ संजय तेलंग, उपाध्याक्ष अॅड. सुभाष जाधव, ख्वाजामियाँ पठाण , बाबासाहेब मस्के यांच्यासह लखन वैद्य , विशाल कांबळे , अमोल हातागळे , लक्ष्मण कसबे , अजय गोरे , नितिन सरवदे , अनिल कांबळे , व रत्नदिप सरवदे इतर कार्येकर्ते उपस्थित होतेे.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED