✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.9सप्टेंबर):-रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड रविप्रकाशजी ऊर्फ बापुसाहेब देशमुख साहेब यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा प्रमुख सुनिल नानासाहेब ठोसर हे महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार, मुकादम, आणि वाहतूकदार यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या मागण्या संदर्भात भुमिका घेऊन जोपर्यंत लढा यशस्वी होत नाही.

तोपर्यंत रयत शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा प्रमुख सुनिल ठोसर हे सर्व ऊसतोड कामगार यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचा लढा उभा करू असे ते म्हटले आहे. मागण्या मान्य न झाल्यास ऊसतोड कामगारांच्या आंदोलनामध्ये उतरणार असून आता साखर कारखान्याचा मालक आणि ऊसतोड कामगारांचा नेता प्रतिनिधी होणार नाही. अशा प्रकारची भुमिका रयत शेतकरी संघटनेने घेतली आहे..प्रमुख मागण्या पाच वर्षाचा करार तीन वर्षात झाला पाहिजे.

दीडशे पट भाव वाढ मिळाली पाहिजे.

वाहतूकीच्या दरामध्ये वाढ झाली पाहिजे.

मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ झाली पाहिजे.

या सह अनेक मागण्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे.. अड रवी प्रकाश बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील ठोसर बीड जिल्हा प्रमुख रयत शेतकरी संघटना यांच्या उपस्थितीत गंभीर असे नियोजन करू..

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED