महत्व वृक्ष लागवडीचे

396

वृक्ष लागवड करा भविष्य घडवा या वाक्यातच सारे सारे लपलेले आहे. आपल्या राज्याला नैसर्गिक सौंदर्याचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. राज्यात जी पर्यटनस्थळे आहेत ती वृक्षांनी बहरलेली आहेत. त्यामुळेच ते पर्यटकांचे आकर्षणाचे स्थान राहिले आहे. परंतु आपल्याच मानवनिर्मित काही गंभीर चुकांमुळे वृक्षांचे प्रमाण कमी होत गेले आहे. त्यामुळे दुष्काळ वाढते प्रदूषण व निसर्गाचा ऱ्हास असे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत शासनालाही ही समस्या भेडसावत आहे.

त्यामुळेच शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था आणि विविध प्रसारमाध्यमे याद्वारे वृक्षलागवडीचे महत्व राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे अविरत पणे काय चालू आहे. हे निश्चितच कौतुकास्पद बाब आहे शासनानेही या वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत आणि सामाजिक संस्था याद्वारे वृक्षलागवडीचे कार्य जोमाने सुरू झाले आहे. शासनाने याची गंभीर दखल घेऊन वृक्ष लागवड नाही तर त्यांच्या संगोपनासाठी ही विविध योजना आखण्यात, आल्या आहेत. शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना वृक्षलागवडीच्या उपक्रमात सहभागी करून घेणे ही फायदेशिर गोष्ट आहे. विशेषता लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि युवक वर्ग यांनी पुढे येऊन सामान्य जनतेपर्यंत या उपक्रमाचे महत्त्व पोहोचवणे गरजेचे आहे.

यामुळे नक्कीच सकारात्मक कार्य घडेल. वृक्षांचे प्रमाण वाढून पर्जन्याचे प्रमाण वाढेल व दुष्काळाचा ऱ्हास होईल व मानवाचे जीवन सुखकर होईल. आपल्याला जो नैसर्गिक सौंदर्याचा वारसा आहे त्याचा अभिमानही कायम राहील, हीच सदिच्छा. तेव्हा वृक्ष लागवड करा भविष्य घडवा हे बोधवाक्य बरेच काही सांगून जाते.

✒️अमोल मांढरे:-वाई,सातारा
मो:-7709246740

▪️संकलन:-प्रा.रावसाहेब राशिनकर
(अहमदनगर प्रतिनिधी)
मो:-9404322931