सिरसाळा येथे आज (14 सप्टेंबर) रोजी 17 कोरोना बाधित

    37

    ✒️आतुल बडे(परळी, प्रतिनिधी)मो:-9096040405

    परळी(दि.14सप्टेंबर):-प्रशासनाने सोमवारी सिरसाळ्यात घेतलेल्या अँटीजन टेस्ट मध्ये 17 जण कोरोनाfबाधित आढळून आले. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी यंत्रणेने व्यापाऱ्यांना टेस्ट बंधनकारक केल्यामुळे टेस्ट करून घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

    येथील न्यू हायस्कुल शाळेमध्ये लोकांनी रांगा लावून टेस्ट करून घेतली.एकूण 548 टेस्ट करण्यात आल्या त्यापैकी 17पॉसिटीव्ह निघाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ सोमनाथ मुंडे यांनी दिली.यावेळी,आरोग्य सहाय्यक राधाकिशन राऊत,शिवाजी राठोड,डॉ अमोल देवळे,कसबे सर,आसेफ पठाण,अश्विनी बानसोडे आदी कर्मचाऱ्यांनी सहभागी झाले होते.