✒️ अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

जालना(दि.16सप्टेंबर);- जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव शिवारातील लिंगसेवाडी जवळील गोदापात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. नदीतील पात्रात एका झाडाला हा मृतदेह अडकल्याचे दिसून आले.

याची माहिती पोलिसांना दिल्यावर जमादार श्रीधर खडेकर व भगवान शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी येथील आरोग्य केंद्रात करण्यात आली.पुढील तपास गोंदी पोलीस स्टेशन अंतर्गत असणारे पोलीस करत आहेत.

Breaking News, महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED